Adani : जगातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी आणखी एक कमाल केली आहे. आता गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अॅमेझॉनचे (Amazon) मालक जेफ बेझोसला (Jeff Bezos) मागे टाकून त्यांनी हे विजेतेपद पटकावले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, हा फेरबदल गेल्या 24 तासांत झाला आहे. सध्या बेझोस आणि अदानी यांची संपत्ती जवळपास समान आहे. वास्तविक, अदानी यांच्या संपत्तीत गेल्या एका दिवसात 2.12 अब्ज डॉलरची घट झाली आहे, तर जेफ बेझोसच्या संपत्तीत 2.74 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
आता या दोन अब्जाधीशांची संपत्ती 147 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर आणि बेझोस तिसऱ्या क्रमांकावर आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या निर्देशांकात गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काल दुसऱ्या क्रमांकावर होते.
इलॉन मस्क (Elon Musk) या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 264 अब्ज डॉलर आहे. गौतम अदानी अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट असून त्यांची संपत्ती 138 अब्ज डॉलर आहे. पाचव्या क्रमांकावर बिल गेट्स (Bill Gates) आहेत, ज्यांची संपत्ती 112 अब्ज डॉलर्स आहे. वॉरन बफे सहाव्या क्रमांकावर आहेत. सातव्या क्रमांकावर लॅरी पेज, आठव्या क्रमांकावर सर्जी ब्रिन, नवव्या क्रमांकावर लॅरी एलिसन आणि दहाव्या क्रमांकावर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आहेत. अंबानींची संपत्ती 88.7 अब्ज डॉलर आहे.
अदानी एंटरप्राइझचे मालक गौतम अदानी यांचा कॉलेजमधून बाहेर पडण्यापासून ते स्वतःचा हिरा व्यवसाय सुरू करण्यापर्यंतचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 137 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सामान्य माणूस ते बिझनेस टायकून असा त्यांचा प्रवास अत्यंत रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. बंदरापासून ऊर्जा, हरित ऊर्जा आणि इतर अनेक उद्योगांमध्ये अदानीची लक्षणीय उपस्थिती आहे.