Gautam Adani Empire: मुंबई : फक्त मागील वर्षभरातच सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहावरील कर्जात तब्बल 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या समूहाच्या वतीने घेतलेल्या एकूण कर्जापैकी 29 टक्के कर्जे जागतिक बँकांची आहेत. हिंडेनबर्ग अहवालानंतर समूहाच्या एकूण विश्वासार्हतेचे रक्षण करण्यासाठी, रोखे आणि कर्जाव्यतिरिक्त शेअर्स गहाण ठेवून सतत पैसे उभारत आहे. अशा पद्धतीने सरकारी कुबड्या घेऊन मोठे होत असल्याचा आरोप असलेल्या कंपनीवर आता आणखी बिकट स्थिती ओढवली आहे. त्यातून कंपनी कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता कर्ज उभारण्यासाठी या ग्रुपने परदेशात रोड शोही केले आहेत. अमर उजाला यांनी बातमीत म्हटले आहे की, मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे की, मार्च तिमाहीत अदानी समूहाने तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडले आहे. मार्च तिमाहीत प्रवर्तकांच्या कर्ज म्हणून ठेवलेल्या शेअरमध्येही घट झाली आहे. तसेच 36 अब्ज रुपयांच्या कमर्शियल पेपरची परतफेड करणे शक्य झाले आहे. दरम्यान, मार्च 2023 मध्ये देशाची रत्ने आणि दागिन्यांची निर्यातसुद्धा 23.75 टक्क्यांनी घसरून 21,502 कोटी रुपयांवर आली. मागील वर्षी याच महिन्यात हा आकडा 28,198.36 कोटी रुपये होता. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) यांनी याबाबत मंगळवारी सांगितले की, भौगोलिक-राजकीय आव्हानांमुळे उद्योगावर परिणाम झाला आहे.
GJEPC चे अध्यक्ष विपुल शाह यांनी सांगितले की एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांची निर्यात 2.97 टक्क्यांनी घटून 1,76,696 कोटी रुपये झाली आहे. आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये एकूण निर्यात 2,93,193 कोटी रुपये होती. 2022-23 मध्ये ते 2.48 टक्क्यांनी वाढून 3,00,462 कोटी रुपयांवर पोहोचले. तर, महाराष्ट्रातील कमी उत्पादनामुळे 15 एप्रिलपर्यंत देशभरातील साखरेचे उत्पादन 6 टक्क्यांनी घटून 31.1 दशलक्ष टन झाले आहे. गेल्या वर्षी उत्पादन 32.8 दशलक्ष टन होते. ISMA डेटानुसार, 1 ऑक्टोबर 2022 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन 96.6 लाख टन झाले.
- RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेला ठोठावला कोटींचा दंड; ‘हे’ आहे कारण
- Asia Cup 2023 : ‘त्या’ प्रकरणात पाकिस्तानने दिली श्रीलंकेला धमकी, वाचा सविस्तर
- Airtel Recharge Plan: जबरदस्त! फक्त 155 रुपयांमध्ये एअरटेल देत आहे अनलिमिटेड कॉलिंगसह ‘ही’ भन्नाट सुविधा
- Xiaomi 12 Pro: भन्नाट ऑफर! Xiaomi चा ‘हा’ स्टायलिश फोन मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये,पहा संपुर्ण डील
- Health Tips: उच्च रक्तदाबापासून ते सांधेदुखीपर्यंत ओवाचे ‘हे’ 4 फायदे जाणून व्हाल थक्क