Garlic Peel : सावधान! लसणाची साल कचरा समजून फेकताय? फायदे जाणून व्हाल चकित

Garlic Peel : लसूण हा एक औषधी गुणधर्मांनी समृद्ध एक औषधी मसाला असून तुम्ही त्याचे सेवन केले तर तुमच्या अनेक आरोग्यास अनेक फायदे मिळतात. लसणाचा वापर औषधांपासून ते स्वयंपाकापर्यंत प्रत्येक गोष्टीत करतात. पण तुम्ही लसणाची साल कचरा समजून फेकत असाल तर वेळीच सावध व्हा.

लसणाच्या सालीत असतात पोषक घटक

लसणाच्या सालीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्याने आयुर्वेदात लसणाला औषध मानले जाते. लसणाच्या सालीची पावडर पिझ्झा आणि सँडविच सारख्या गोष्टींवर मसाला म्हणून वापरण्यात येते. दम्यापासून पायांच्या सूजापर्यंत आराम मिळतो.

जाणून घ्या लसणाच्या सालीचे फायदे

पायांची सूज

सुजलेल्या पायांपासून आराम मिळवण्यासाठी लसणाच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी कोमट पाण्यात लसणाची साले टाका आणि त्या पाण्यात काही वेळ पाय बुडवून ठेवा. पायांची सूज आणि वेदना हळूहळू कमी होत जाते.

सूप बनवणे

लसणाच्या सालीमध्ये अँटीवायरल, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळत असल्याने जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, आपण ते भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पतींनी समृद्ध सूपमध्ये वापरू शकता. असे केल्याने सूपचे पौष्टिक मूल्य वाढेल आणि त्याची चव वाढते. लसणाच्या सालींमुळे पुलाव किंवा तळलेल्या भाताची चवही वाढते. यासाठी लसणाची साले पाण्यात उकळून त्याचा वापर करणे गरजेचे आहे.

त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर

ज्यांना खाज सुटणे आणि एक्जिमा सारख्या त्वचेशी निगडित समस्या आहेत त्यांच्यासाठी लसणाची साल खूप फायदेशीर आहे. हा उपाय करण्यासाठी लसणाची साले काही तास पाण्यात भिजत ठेवणे गरजेचे आहे. यानंतर हे पाणी त्वचेच्या प्रभावित भागात लावा. असे केल्याने खाज आणि जळजळीच्या समस्येपासून आराम मिळेल. त्याचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्समध्ये खूप फायदेशीर आहेत.

दम्याचे रुग्ण

लसणाच्या सालीचा दम्याच्या रुग्णांना खूप फायदा होतो. अस्थमाच्या रुग्णांनी लसणाची साले बारीक करून मधासोबत सकाळी आणि संध्याकाळी सेवन केले तर तुम्हाला परिणाम पाहायला मिळेल. हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोनदा खा. यामुळे दम्याच्या लक्षणांपासून आराम मिळेल.

केसांच्या समस्या

लसणाच्या साली पाण्यात उकळून केसांना लावल्या तर डोक्यातील कोंडा आणि टाळूला खाज येणे यासारख्या केसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

Leave a Comment