WagonR Offers: तुम्ही देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.
मारूती सुझुकीने भारतीय बाजारात फेस्टिवल सीजनपूर्वी एक दमदार ऑफर जाहीर केली आहे. ज्याचा फायदा लाभ घेत आता Alto, Swift, WagonR, Celerio, S-Presso सारख्या कार्स कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. मात्र हे जाणुन घ्या ही ऑफर फक्त सप्टेंबर 2023 साठी आहे.
Maruti Alto 800
या ऑफर अंतर्गत मारुती अल्टो 800 चे पेट्रोल व्हेरिएंट खरेदीवर तुम्हाला कंपनी 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,100 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.
Maruti Alto K10
Alto K10 च्या पेट्रोल व्हेरिएंटवर कंपनी 35,000 रुपयांपर्यंत रोख सवलत मिळवू शकते. तसेच त्याच्या CNG व्हेरिएंटवर 20,000 रुपयांची रोख सूट उपलब्ध आहे. हॅचबॅकच्या सर्व व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,100 रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.
Maruti S-Presso
S-Presso च्या पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर कंपनी 35,000 रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे. या ऑफरमध्ये 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,100 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.
Maruti Wagon-R
Wagon-R वर कंपनी रु. 30,000 पर्यंत रोख सवलत देत आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी रु. 15,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 4,000 कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे.
Maruti Swift
मारुती स्विफ्टच्या पेट्रोल मॉडेलवर 35,000 रुपयांपर्यंत कंपनी डिस्काउंट देत आहे. तर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे.
तर दुसरीकडे स्विफ्टच्या सीएनजी व्हेरिएंटवर तुम्हाला 25,000 रुपयांची रोख सूट मिळू शकते. तर 5,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या डीलरशिपला भेट देऊ शकता.