Fraud Seed Alert: अहमदनगर : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान यामध्ये गळीत धान्य पिकासाठी मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊन आता शेकडो शेतकऱ्यांना मोठा झटका सहन करावा लागला आहे. लाभ नको पण आता या तोट्यातून बाहेर कसे पडायचे असा गंभीर प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.
याबाबत माहिती देताना कृषी अधिकारी अशोक साळी यांनी सांगितले की, याबद्दल आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या जात आहेत. सोयाबीन बियाण्याच्या नमुन्याची तपासणी करून पुढे याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. 50 टक्के अनुदान यानुसार अकोले तालुक्यातील कोतूळ, ब्राह्मणवाडा, धामनगाव आवरी यासह अनेक गावांतून याबद्दल तक्रारी आलेल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, महाबीज या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीचे असे बियाणे आहे. बियाणे उगवले नसल्याने आता अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
कृषी अधिकारी साळी यांच्यासह कृषी सहायक यांनीही शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या आहेत. योजनेतून मिळालेले बियाणे हे कुचकट आणि काळपट रंगाचे असून योग्य पद्धतीने बियाणे निवड केली नसल्याचे दिसते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. योजनेतून mahabeej MAUS 712 / 726 soybean seed याचे वाटप करण्यात आलेले आहे.
- Samsung Galaxy : फक्त साडेसहा हजारांत मिळतोय हा शानदार स्मार्टफोन; पहा, काय आहे डील ?
- Small Saving Schemes : मोदी सरकारची मोठी घोषणा; ‘या’ स्कीमच्या व्याजदरात केली वाढ
- Foods For Lung Health : फुफ्फुसांचं आरोग्य जपा! ‘या’ पदार्थांचा आहारात आजच करा समावेश
- Waste Economy : कचऱ्यातून बक्कळ कमाई! पहा, कशी भरतेय सरकारची तिजोरी ?
- Small Scale Business : फक्त 1 लाखांत सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल फायदा, होईल भरभराट