FPO : काय आहे FPO? शेतकऱ्यांना कशाप्रकारे येते बनवता? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, ज्यामुळे बदलले शेतकऱ्यांचे नशीब

FPO : केंद्र सरकार एफपीओना इक्विटी ग्रँट आणि क्रेडिट गॅरंटी फंड स्वरूपात मदत करते. आता तुम्हीही FPO तयार करू शकता. FPO मुळे अनेक शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. काय आहे FPO? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

समजा तुम्हाला तुमचा स्वतःचा एफपीओ म्हणजे शेतकरी उत्पादक संस्था तयार करायची असेल, तर तुम्हाला यासाठी फार कष्ट करण्याची गरज नाही. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

काय आहे एफपीओ?

शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच एफपीओ हा शेतकऱ्यांनी तयार केलेला स्वयं-सहायता गट असून जो लहान आणि अत्यल्प शेतकऱ्यांचा समूह आहे. याच्याशी निगडित शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ तर मिळतेच पण शिवाय खते, बियाणे, औषधे आणि कृषी उत्पादने देखील मिळतात. हे लक्षात घ्या की एफपीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो. यामध्ये मध्यस्थ नास्ता. एफपीओचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करणे आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • जमिनीची कागदपत्रे
  • कायम रहिवासी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकची छायाप्रत इ.

असा तयार करा FPO

शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्यासाठी सर्वात अगोदर शेतकऱ्यांचा एक गट तयार करावा लागतो. या ग्रुपमध्ये किमान 11 सदस्य असावे लागतात. यानंतर तुम्हाला नावाचा विचार करावा लागेल. तसेच त्याची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी करणे गरजेचे आहे.

हे लक्षात ठेवा की शेतकरी उत्पादक संघटनेच्या सर्व सदस्यांना शेतकरी असणे आणि त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे बंधनकारक आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही FPO तयार करण्यासाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, स्मॉल फार्मर्स ॲग्री-बिझनेस कन्सोर्टियम आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ/NCDC यांच्याशी संपर्क साधता येईल.

Leave a Comment