पुणे : मानव आणि वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी वनविभागातर्फे नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये वन्यप्राण्यांनी मानवावर केलेला थेट हल्ला असो की शेतमालाची केलेली नुकसान असो, त्यासाठी भरपाई देण्याची तरतूद आहे. ही सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे.
न्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक रकमेत वन विभागाने वाढ करून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयास दहा लाख रुपये तसेच हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांसाठी ४० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद केली आहे. यामध्ये प्रमुख्याने वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर, रानकुत्री या प्राण्यांनी हल्ला केल्यास नुकसान भरपाई अथवा आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी आपणास :: MAHARASHTRA FOREST DEPARTMENT :: (mahaforest.gov.in) या लिंकवर जाऊन सर्व माहिती द्यावी लागणार आहे. (www.intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=compensationapl&DAMAGE_CATEGORY=1&AntiFixation=e587cacff503195658d6818fc1c0bb0e)
तसेच शेतमालाची नुकसान केलेली असल्यास www.intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=compensationapl&DAMAGE_CATEGORY=2&AntiFixation=3de99ca5ebf9b87887a91f324941690d या लिंकवर आणि वन्य प्राण्यांनी पशुधनाची हानी केल्यास www.intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=compensationapl&DAMAGE_CATEGORY=3&AntiFixation=4df20758cfa4585c6b8b22d013636465 या लिंकवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.