India China Relations : चीनचा डाव! भारतानेही दिले रोखठोक उत्तर; पहा, पुन्हा का धुमसतोय भारत-चीन वाद?

Foreign Minister S. Jaishankar replies to China : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू (India China Relations) असतानाच चीनने भारताची खोडी (Foreign Minister S. Jaishankar replies to China) काढण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर आपला (Arunachal Pradesh) हक्क सांगत येथील 30 ठिकाणांची नावांची यादी जाहीर केली आहे. मात्र या नावांचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. परंतु ही नावे चिनी अक्षरात लिहिली आहेत. यामध्ये पर्वत, नद्या आणि काही ठिकाणांचा समावेश आहे ज्यांची नावे चीनने दिली आहेत. आता या प्रकरणात विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. परंतु हा प्रकार गंभीर असल्याने भारत सरकारनेही याची दखल घेतली आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी (S. Jaishankar) अरुणाचल प्रदेश वर दावा करणाऱ्या चीनला कठोर शब्दांत फटकारले आहे. सोमवारी गुजरातमधील सूरत शहरात ते म्हणाले, की आज मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते घर माझे होईल का? असा सवाल त्यांनी चीन सरकारला विचारला आहे. अरुणाचल प्रदेश हे भारताचे राज्य होते आहे आणि राहील. नाव बदलल्याने काहीही फरक पडणार नाही. तुम्हा सर्वांना माहित आहे की आमचे सैन्य त्या ठिकाणी तैनात आहे. लष्कराच्या लोकांना तिथे काय करायचे हे चांगलं माहिती आहे, असा इशाराही जयशंकर यांनी यावेळी दिला.

China News : जिनपिंग आणखी शक्तिशाली; चीनमध्ये सत्ताधाऱ्यांनी टाकला ‘हा’ मोठ्ठा डाव!

India China Relations

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं आहे जेव्हा सोमवारीच चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावांची यादी जाहीर केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पत्रकाराने परराष्ट्रमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी चीनला कठोर शब्दात उत्तर दिले. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनच्या या प्रकाराला भारताने कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्स मीडियानुसार चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने जंगनान मधील प्रमाणित भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली. चीन अरुणाचल प्रदेशला जंगनान या नावाने संबोधित करतो आणि या राज्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर या प्रदेशासाठी 30 अतिरिक्त नावे देखील पोस्ट करण्यात आली आहेत. ही यादी 1 मे पासून लागू होणार आहे. तिथल्या मंत्रालयाने 2017 मध्ये जंगनानमधील सहा ठिकाणांची मानकीकृत नावांची पहिली यादी जाहीर केली होती. 2021 मध्ये 15 ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर 2023 मध्ये 11 ठिकाणांच्या नावांसह तिसरी यादी जाहीर केली होती.

India China Relations

अरुणाचल प्रदेशला भारतीय भाग म्हणून मान्यता देताना अमेरिकेने याआधी चीनच्या एलएसी सीमा वाढविण्याच्या दिशेने उचललेल्या पावलांवर कठोर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi)नुकत्याच झालेल्या राज्याच्या दौऱ्यानंतर चीनने या दौऱ्यावर टीका केली होती.

China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च

Leave a Comment