Foods Avoid In Thyroid । जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्हाला काही पदार्थांपासून दूर राहावे लागणार आहे. नाहीतर चवीच्या लालसेचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होईल. कोणते आहेत हे पदार्थ जाणून घ्या.
चहा किंवा कॉफी
थायरॉईडचा त्रास जाणवत असेल तर चुकूनही चहा आणि कॉफीचे सेवन करू नये. कारण कॅफिनचे सेवन केले तर तुमची आधीच सुजलेली थायरॉईड ग्रंथी अधिक सुजते. हे थायरॉक्सिन हार्मोनचे उत्पादन कमी करत असल्याने थायरॉईड बरे होण्यास विलंब होतो.
तळलेले अन्न
थायरॉईडच्या रुग्णांनी तेलकट पदार्थ जसे की भजी, तळलेले चिकन, समोसे इत्यादी खाऊ नये. या सर्वांमध्ये असंतृप्त चरबी आढळते ज्यामुळे थायरॉईडची समस्या वाढत जाते.
ग्लूटेन पदार्थ
पास्ता, मैदा, गहू, बार्ली इत्यादी ग्लूटेन पदार्थ खाणे देखील थायरॉईडच्या रुग्णासाठी हानिकारक ठरते. यामुळे थायरॉईडमध्ये सूज वाढते. ग्लूटेन फ्री पीठ वापरले तर ते चांगले होईल.
अल्कोहोल
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अल्कोहोलच्या सेवनाने थायरॉईड ग्रंथीवर वाईट परिणाम होतो. यामुळे थायरॉईड हार्मोन तयार होत नाही ज्यामुळे तुमची समस्या आणखी वाढते. असे असल्याने थायरॉईडचे तज्ज्ञ अल्कोहोलचे सेवन न करण्याचा सल्ला देतात.
केक
समजा तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर तुम्ही जास्त गोड पदार्थ खाऊ नये. केकमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असून त्यात कोणतेही पोषक घटक आढळत नाहीत. यासोबतच ते तुमचे चयापचय कमी करते ज्यामुळे तुमचे वजन वाढते.