किती लोकांसाठी: 3
साहित्य: चवळी – 2 कप, कांदा (Onion )- 1/2 कप, टोमॅटो(Tomato) चिरलेला – 1/2 कप, उकडलेले बटाटे (Potato)चिरलेले – 1/2 कप, काकडी (Cucumber )- 1/2 कप, डाळिंब – 1/4 कप, कोथिंबीर – 1/4 कप, लिंबाचा रस(Lemon Juice ), भाजलेले शेंगदाणे – 1/4 कप, मीठ – चवीनुसार, जिरे पूड – 1 टीस्पून, लाल मिरची पावडर(Red chili Powder ) – 1/2 टीस्पून, चाट मसाला – 1/2 टीस्पून
प्रक्रिया:
- सर्वप्रथम चवळी चांगली धुवून 4-5 तास पाण्यात भिजत ठेवावी.
- यानंतर कुकरमध्ये एक कप पाणी (Water )आणि मीठ(Salt ) टाकून दोन ते तीन शिट्ट्या करून उकळा.
- आता एका भांड्यात काढा आणि थंड होऊ द्या.
- तोपर्यंत सर्व भाज्या चिरून घ्याव्यात.
- त्याच बरोबर पॅनमध्ये सर्व मसाले 10-20 सेकंद तळून घ्या.
- Free Travel: “ही ” आहेत देशातील 5 प्रसिद्ध टिकणे जेथे तुम्ही राहू शकता मोफत
- Food Tips: पोहे आहेत खूप फायदेशीर, लोह-फायबर सारख्या पोषक तत्वांमुळे मिळतील अनेक फायदे
- Health Tips: ‘या’ रुग्णांनी दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर करा हे काम; राहील आरोग्य चांगले
चाट बनवण्यासाठी :
- ‘चवळी थोडा थंड झाल्यावर त्यात भाज्या आणि मसाले एकत्र करा. चवीनुसार मसाले आणि मीठ वाढवता किंवा कमी करता येतात.
- सर्व्ह करण्यापूर्वी त्यात चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि भाजलेले शेंगदाणे घाला.
- ‘चवळी चाट’ सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.