Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सर्वसामान्यांना दिलासा: खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घसरण; जाणुन घ्या नवीन दर

Edible Oil Prices; हळूहळू सरकारने (central government) उचललेल्या पावलांचा परिणाम दिसू लागला आहे. महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. आता खाद्यतेलाचे दर (Oil Prices) पुन्हा एकदा खाली आले आहेत. दिल्ली-एनसीआरच्या प्रमुख दूध पुरवठादारांपैकी एक असलेल्या मदर डेअरीने (mother dairy) खाद्यतेलाच्या किमती 15 रुपयांनी कमी केल्या आहेत.

Advertisement

193 प्रति लिटर दर
जगभरातील बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती खाली आल्याचे मदर डेअरीच्या वतीने सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनी आपले खाद्यतेल धारा ब्रँड अंतर्गत विकते. धारा मोहरीच्या तेलाची (एक लिटर पॉली पॅक) किंमत 208 रुपयांवरून 193 रुपये प्रति लीटर झाली आहे.

Advertisement

एमआरपीमध्ये 15 रुपयांपर्यंत कपात
याशिवाय धारा रिफाइंड सनफ्लॉवर ऑईल (1 लिटर पॉली पॅक) पूर्वी 235 रुपये प्रति लीटर वरून आता 220 रुपयांना विकले जाईल. धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची (1 लिटर पॉली पॅक) किंमत 209 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत कमी केली जाईल. मदर डेअरीने एका निवेदनात म्हटले आहे की, “धारा खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत (MRP) प्रति लिटर 15 रुपयांनी कमी केली जात आहे.”

Loading...
Advertisement

नवीन एमआरपी तेल पुढील आठवड्यापर्यंत येईल
किमतीतील ही घट अलीकडील सरकारी उपक्रम, आंतरराष्ट्रीय बाजाराचा कमी झालेला प्रभाव आणि सूर्यफूल तेलाची वाढलेली उपलब्धता यामुळे झाली आहे. नवीन एमआरपीसह धारा खाद्यतेल पुढील आठवड्यापर्यंत बाजारात पोहोचेल. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर गेल्या वर्षभरापासून चढेच आहेत.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत दरवर्षी सुमारे 13 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करतो. खाद्यतेलासाठी देशाची आयात अवलंबित्व 60 टक्के आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply