Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

केरळनंतर मान्सूनने ‘या’ राज्यात दिला दणका; पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली –  भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) दमदार हजेरी लावली आहे. यानंतर ईशान्येकडील राज्यांसह बंगालमध्ये सुमारे पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालमध्ये 8 जूनच्या सकाळपर्यंत कूचबिहार, जलपाईगुडी, अलीपुरद्वार, दार्जिलिंग आणि कलिमपोंग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवस ईशान्येच्या हवामानावर परिणाम होईल, तर बंगालच्या गंगेच्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

या राज्यांमध्ये पाऊस पडेल
हवामान खात्याने सांगितले की, उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागावर आणि पश्चिम बंगालच्या गंगेच्या भागावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरातून ईशान्य भारताच्या दिशेने जोरदार नैऋत्य वारे वाहणार आहेत. भारतीय हवामान विभाग (IMD) ने शुक्रवारी सांगितले की नैऋत्य मान्सूनने संपूर्ण उत्तर-पूर्व राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचा काही भाग व्यापला आहे, त्यामुळे तेथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

तत्पूर्वी, IMD ने पुढील पाच दिवसांत केरळ, किनारी कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाट आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला होता.

Advertisement

दिल्लीत आज यलो अलर्ट
शनिवारी राजधानीत विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. सफदरजंग वेधशाळेत पारा 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग हवामानाच्या सूचनांसाठी 4 कलर कोड वापरतो, ज्यात हिरवा (कृती आवश्यक), पिवळा (पाहा आणि अपडेट रहा), केशरी (तयार रहा) आणि लाल (कृती करा) यांचा समावेश आहे.

Advertisement

हवामान खात्यानुसार, मान्सून 25 जूनपर्यंत दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि लगतच्या राज्यांमध्ये पोहोचू शकतो. त्याचबरोबर छत्तीसगड, झारखंड, बिहारमध्ये 15 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply