Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधानांनी दिला 2000 रुपयांचा गिफ्ट; जर तुमच्या खात्यात जामा नाही झाले; तर करा ‘हे’ काम

दिल्ली –  पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) 11व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. याशिवाय अनेक योजनांतर्गत एकूण 22 लाख कोटींची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली.

Advertisement

रॅलीपूर्वी, पंतप्रधानांनी विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता म्हणून 21,000 कोटी रुपये जारी केले. मात्र, या काळातही अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांच्या खात्यात योजनेची रक्कम अद्याप आलेली नाही. जर तुम्हीही या शेतकर्‍यांपैकी एक असाल, तर करा हे काम ताबडतोब   जेणेकरून तुम्हाला 11 वा हप्ता मिळू शकेल.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

काय केले पाहिजे?
पीएम किसानच्या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांना ekyc करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही ते केले नसेल तर 11वा हप्ता तुमच्या खात्यात आला नसता. परंतु जर तुम्ही EKYC केले असेल आणि तरीही योजनेची 11 वी मिळालेली नसेल, तर तुम्ही तुमचा अर्ज तपासावा. त्यात दिलेली कागदपत्रे आणि बँकेचे तपशील तपासावेत. कारण यापैकी काही चूक झाली तर योजनेचा हप्ता मिळणार नाही.

Loading...
Advertisement

ई-केवायसी कसे करावे

Advertisement

सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला ‘फार्मर्स कॉर्नर’ वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर ‘eKYC’ पर्यायावर क्लिक करा.
आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
त्यानंतर ते सबमिट करा आणि तुमचे ई-केवायसी होईल.

Advertisement

स्थिती आणि लाभार्थी यादी पहा
यासोबतच तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत तुमची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादी देखील तपासली पाहिजे. स्थिती तपासल्यानंतर, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता कधी मिळेल हे कळेल. जर तुम्ही ‘लाभार्थी यादी’ तपासली तर तुमचे नाव दिसत नसेल तर याचा अर्थ तुमच्या अर्जात एक त्रुटी आहे, जी तुम्ही पोर्टलवर आणि ऑफलाइन दुरुस्त करू शकता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply