Take a fresh look at your lifestyle.

Good News: उष्णतेपासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी केरळमध्ये दाखल होणार मान्सून

दिल्ली-  एनसीआर, यूपी, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणासह देशातील अनेक राज्ये तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत, परंतु यापासून दिलासा मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Advertisement

मात्र, मान्सून दरवर्षीपेक्षा थोडा लवकर दाखल होईल. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार मान्सून (Monsoon) 27 मे रोजी केरळमध्ये पोहोचेल. साधारणत: 1 जूनपासून मान्सूनला सुरुवात झाली असली तरी यावेळी तो 4 दिवस आधी दाखल होणार आहे. हवामान खात्याने आपल्या दीर्घकालीन अंदाजात यापूर्वी 20 मे रोजीच मान्सून केरळमध्ये पोहोचेल असे म्हटले होते, परंतु आता नवीन माहितीमध्ये त्याला एक आठवडा उशीर झाल्याचे म्हटले आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

देशात नैऋत्येकडून मान्सूनचे आगमन हे शेतीसाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. मात्र यंदाच्या होळीपासून ज्याप्रकारे कडाक्याच्या उकाड्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे उन्हाचा तडाखा टाळता यावा म्हणून लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Advertisement

हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, ‘यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये 1 जूनच्या सामान्य तारखेपेक्षा थोडा लवकर दाखल होऊ शकतो. केरळमध्ये 4 दिवस अगोदर 27 मे रोजी मान्सून दाखल होईल. खरं तर, संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात उष्मा वाढला आहे आणि आता मान्सूनच्या आगमनानेच दिलासा अपेक्षित आहे.

Advertisement

2010 नंतर पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर दाखल होत आहे.

Advertisement

मात्र, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही उत्तर भारतात पाऊस सुरू होण्यास सुमारे दोन आठवडे लागले आहेत. अशा परिस्थितीत 15 जूनपर्यंत यूपी, दिल्ली, बिहार, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये पाऊस सुरू होईल आणि उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल, असे मानले जात आहे. 27 तारखेलाच मान्सून केरळमध्ये पोहोचला, तर 2010 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा मान्सून थोडा लवकर दार ठोठावेल. यापूर्वी, गेल्या वर्षी 3 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते, त्याशिवाय तो 1 जून 2020 रोजी आला होता. त्याच वेळी, 2019 मध्ये, मान्सूनने 8 जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर दस्तक दिली होती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply