Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ: हवामानात बदल; पुढील पाच दिवस ‘या’ राज्यात मुसळधार पाऊस

दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून भीषण उष्मा आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या दिल्ली-एनसीआरसह (Delhi NCR) अनेक भागातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. हिमालयात पश्चिम विक्षोभ निर्माण झाल्यामुळे हवामानात बदल दिसून येत आहे. त्यामुळे अनेक भागात कडाक्याच्या उन्हापासून आणि कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळत आहे.

Advertisement

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे आणि दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांच्या दाबामुळे आजही गढवाल आणि कुमाऊ विभागातील पर्वतीय भागात पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. उद्यापासून या भागात हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

Advertisement

आज दिल्लीसह अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, यामुळे उष्णतेपासून फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात 25 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पुढील 24 तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात पुढील पाच दिवस पाऊस पडेल. पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये धुळीचे वादळ किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

स्कायमेट हवामानानुसार, पुढील 24 तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, उत्तर किनारी आंध्र प्रदेश, पश्चिम हिमालय, सिक्कीम, हिमालयीन पश्चिम बंगाल आणि पूर्व बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. झारखंड, दक्षिण गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा येथे हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply