Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, ठाकरे सरकारकडून निर्णयाचा धडाका, पहा काय काय निर्णय घेतलेत..?

मुंबई : ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आता 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात हा निर्णय जाहीर केला होता. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

Advertisement

राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज झाली. तीत राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली. याशिवाय इतर काही महत्वाचे निर्णय या वेळी घेण्यात आले.

Advertisement

राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी 1 लाख रुपयांपर्यंतच बिनव्याजी कर्ज मिळत होतं. त्यात वाढ करून आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Advertisement
  • राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन प्रवाळ संवर्धन, उपजीविकेलाही प्रोत्साहन, ग्रीन क्लायमेट फंडाचे सहाय्य
  • नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘मॉडेल आयटीआय’ करणार
  • तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज
  • दुय्यम न्यायालय आणि मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमणार
  • शहरांमध्ये प्राचीन अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणार, हेरिटेज ट्री संकल्पना
  • महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply