Food Crisis | बाब्बो..! जगभरात तब्बल ‘इतक्या’ लोकांची होतेय उपासमार; ‘त्या’ अहवालाने केला खुलासा

Global Report on Food Crisis : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया (Global Report on Food Crisis) आणि मालीमध्ये हजारो लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहेत. अहवालात भविष्यातील परिस्थितीचा अंदाज आहे की गाझातील 11 लाख लोक आणि दक्षिण सुदानमधील 79 हजार लोक जुलैपर्यंत उपासमारीच्या गर्तेत आणखी ढकलले जाऊ शकतात. सन 2023 मध्ये 59 देशांमध्ये सुमारे 28.2 कोटी लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करत होते आणि जास्तीत जास्त लोकांना युद्धग्रस्त गाझामध्ये तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. संयुक्त राष्ट्रांच्या ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिसमध्ये (Global Report on Food Crisis) हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

अहवालानुसार 2022 मध्ये 2.4 कोटीहून अधिक लोकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गाझा पट्टी आणि सुदांमध्ये अन्नसुरक्षेची परिस्थिती बिघडली होती. यूएन फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशनचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मॅक्सिमो टोरेरो यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी भुकेचे प्रमाण निश्चित केले आहे. ज्यामध्ये पाच देशांतील सात लाखांपेक्षा जास्त लोक पाचव्या टप्प्यात आहेत. ही उपासमारीची अत्यंत गंभीर पातळी म्हणून ओळखली जाते.

China Taiwan Tension : तैवानने पुन्हा चीनला धमकावले! पहा, चीनने नेमकं काय केलं?

Food Crisis

युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मॅक्सिमो टोरेरो यांनी सांगितले की 2016 मध्ये अहवाल प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाल्यापासून उपासमारीने ग्रस्त असलेल्या लोकांची ही आताची सर्वाधिक संख्या आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि मालीमध्ये हजारो लोक उपासमारीच्या संकटांने ग्रस्त आहेत.

अहवालात भविष्यातील परिस्थितीचा अंदाज आहे की गाझामधील 11 लाख लोक आणि दक्षिण सूदानमधील 79 हजार लोक जुलैपर्यंत पाचव्या टप्प्यात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. या लोकांना पुढील काही दिवसांत तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये नोंदवलेल्या संख्येच्या तुलनेत उपासमार ग्रस्त लोकांच्या संख्येत चारपट वाढ झाली आहे. अर्थतज्ज्ञांनी सांगितले की 80 टक्के लोक तीव्र अन्नधान्य टंचाईचा सामना करत आहेत. यातील 5 लाख 77 हजार लोक एकट्या गाझामधील आहेत. येथे अन्नधान्याच्या दुष्काळाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

Food Crisis

Israel-Gaza War : गाझामध्ये पुन्हा येणार शांतता? रमजानमध्ये युद्धबंदीचा ठराव मंजूर! वाचा सविस्तर

इस्त्रायल आणि हमास युद्धात सर्वाधिक नुकसान गाझा भागाचे झाले आहे. इस्त्रायलच्या सारख्या होणाऱ्या हल्ल्यांनी गाझा पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. येथील नागरिकांना अन्नाच्या कृत्रिम दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. युद्ध थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. कारण युद्ध अजून थांबलेले नाही.

Leave a Comment