Food Crisis : युनायटेड किंगडममधील लाखो लोक अन्न असुरक्षिततेमुळे खाद्यान्नाच्या संकटाचा (Food Crisis) सामना करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. विशेषतः रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून (Russia Ukraine War). युनायटेड किंगडममधील लोकांना युद्धानंतर पुरेसे अन्न खाण्यास मिळत नाहीत. सुरुवातीला कोरोना विषाणूच्या (Corona Virus) साथीने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला होता, आता युक्रेनमधील युद्धामुळे खाण्यापिण्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
फूड फाऊंडेशन या संस्थेच्या अहवालानुसार युक्रेनमधील युद्धाचा थेट परिणाम युनायटेड किंगडमवर झाला आहे. त्यामुळे देशात महागाईही (Infaltion Increase In United Kingdom) वाढली आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, सप्टेंबर महिन्यात पाचपैकी एका अल्प उत्पन्न कुटुंबाला अन्न टंचाईचा सामना करावा लागला आहे. आकडेवारी दर्शवते की सप्टेंबरमध्ये 18 टक्के कुटुंबांना त्यांच्या खाद्य पदार्थांची टंचाई जाणवली. तर ६ टक्के लोकांनी सांगितले की त्यांचा संपूर्ण दिवस अन्न न खाल्ल्याशिवाय जातो.
अन्न असुरक्षिततेत युनायटेड किंगडम सर्वात वाईट स्थितीत आहे. अहवालानुसार, युनायटेड किंगडम अन्न असुरक्षिततेच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. 2022 च्या सुरुवातीपासून देशातील अन्न (Food) आणि ऊर्जेच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक उपाय योजले असताना, देशातील सर्वात असुरक्षित कुटुंबांची स्थिती बिकट होत चालली आहे.
अन्न असुरक्षिततेचा सर्वाधिक फटका मुलांना बसत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते. परिस्थिती अशी झाली आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनी सरकारकडे मुलांसाठी मोफत खाद्य पदार्थांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अद्यापही बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली नाही. युद्धामुळे फक्त रशिया आणि युक्रेन हे दोनच देश भरडले गेले नाहीत तर अनेक देशांना संकटांचा सामना करावा लागत आहे. युनायटेड किंगडम सारख्या विकसित आणि श्रीमंत देशात अशी बिकट परिस्थिती या युद्धामुळे निर्माण झाली आहे.
- Read : Britain Heat Wave : इंग्रजांच्या देशात पुन्हा आलेय ‘ते’ संकट.. लोकांना मिळाला ‘हा’ धोक्याचा इशारा..
- Russia Ukraine War : पुतिन यांची मोठी घोषणा; ‘त्या’ निर्णयामुळे युक्रेनचे टेन्शन आणखी वाढणार..
- Pakistan : बाब्बो.. पाकिस्तानमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळतेय पेट्रोल; महागाईने सरकारही हैराण