Flipkart Offer । दमदार ऑफर! अवघ्या 8,499 रुपयांत घरी न्या हा 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणारा फोन

Flipkart Offer । जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता अवघ्या 8,499 रुपयांत 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणारा फोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्टने ही ऑफर आणली आहे. ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही Infinix Hot 40i हा फोन खरेदी करू शकता.

समजा तुमच्याकडे SBI किंवा ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास आता तुम्हाला हा फोन 1,000 रुपयांच्या सवलतीत मिळू शकतो. त्यामुळे या ऑफरसह फोनची किंमत 8,499 रुपये इतकी होते. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 7,800 रुपयांपर्यंत स्वस्त होईल. हे लक्षात ठेवा की बदल्यात मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असते.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी आपल्या या दमदार फोनमध्ये 1612×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये देण्यात येत असणाऱ्या या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस पातळी 480 nits आहे. फोन 8 GB रिअल आणि 8 GB पर्यंत आभासी रॅमने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला 256 GB पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज मिळत असून प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Mali G57 GPU सह Unisoc T606 चिपसेट देत आहे.

तर फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देत आहे. तसेच सेल्फीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कंपनीच्या या फोनची बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज हा फोन Android 13 वर आधारित XOS 13 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस सारखे पर्याय दिले आहेत.

Leave a Comment