Fixed Deposits : SBI की बँक ऑफ बडोदा, कुठे मिळतील सर्वात जास्त पैसे?

Fixed Deposits : अनेकजण बँकेत पैसे गुंतवतात. तर काहीजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. सर्वात जास्त व्याज मिळेल त्या एफडीमध्ये ग्राहक पैसे गुंतवतात. SBI की बँक ऑफ बडोदामध्ये पैसे गुंतवले तर सर्वात जास्त व्याज मिळेल, असा अनेकांना प्रश्न पडतो.

एसबीआय ग्रीन टर्म डिपॉझिट योजना

हे लक्षात घ्या की ग्रीन डिपॉझिट स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजाचा लाभ मिळत असून ज्येष्ठ नागरिकांना 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या ठेवींवर 7.15 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तर त्याच वेळी, 2222 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 7.40 टक्के दराने व्याज मिळत आहे. सामान्य नागरिकांना 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या एफडीवर 6.65 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. 2222 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या किरकोळ ठेवींवर 6.40 टक्के दराने व्याज मिळेल.

कोणाला घेता येईल योजनेचा लाभ?

रहिवासी, गैर-व्यक्ती आणि NRI ग्राहकांना विशेष ठेव योजनेत गुंतवणूक करता येईल. या योजनेचा लाभ तुम्ही शाखा नेटवर्कद्वारे घेऊ शकता. इतकेच नाही तर ही योजना अजूनही YONO, इंटरनेट बँकिंग सारख्या डिजिटल चॅनेलवर उपलब्ध नाही, पण लवकरच ही योजना ऑनलाइन देखील उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

BoB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट स्कीम

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट सुविधा पुरवत आहे. बँकेच्या या योजनेचा उद्देश पात्रता प्राप्त पर्यावरणीय उपक्रम आणि क्षेत्रांना निधी देण्यासाठी ठेवी जमा करणे हा असून बँकेने 5000 रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ग्राहकांसाठी ही सुविधा आणली आहे.

बँक ग्राहकांना दिले जाणारे व्याज दर एका वर्षाच्या कालावधीसाठी 6.75%, 18 महिन्यांसाठी 6.75%, 777 दिवसांसाठी 7.17% व्याज, 1111 दिवसांसाठी 6.4%, 1717 दिवसांसाठी 6.4% व्याज दिले जात आहे आणि 2201 दिवसांसाठी 6.4% व्याज दिले जात आहेत.

Leave a Comment