Fixed Deposit : तुम्ही आता घरबसल्या श्रीमंत होऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँकेत गुंतवणूक करावी लागणार आहे. या ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही काही दिवसात मालामाल पैसे कमावू शकता.
HDFC बँक FD व्याजदर
एचडीएफसी बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांना ७ दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ३ टक्के ते ६.०० टक्के व्याज देण्यात येत आहे.
येस बँक एफडी व्याज दर
येस बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांना ७ दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी ३.२५% ते ७.२५% दरम्यान व्याज देण्यात येत आहे.
ICICI बँक FD व्याजदर
एचडीएफसी बँकेकडून 7 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3% ते 6.00% दरम्यान व्याजदर देण्यात येत आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक
पीएनबी FD व्याज दर
PNB बँकेकडून 7 दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 3% ते 7% दरम्यान व्याजदर दिला जात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया FD व्याजदर
SBI बँकेकडून 7 दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी 3% ते 5.75% दरम्यान व्याजदर दिला जात आहे.
कॅनरा बँक एफडी व्याज दर
कॅनरा बँकेकडून 7 दिवसांपासून ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 4% ते 6.85% दरम्यान व्याजदर देण्यात येत आहे.
स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी एसएफबी बँकेकडून 7 दिवस ते एक वर्षाच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी 4.50% ते 7.85% दरम्यान व्याज दिले जात आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
या बँकेकडून 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 4% ते 6.85% दरम्यान व्याज दिले जात आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी 3% ते 8.50% दरम्यान व्याज दिले जात आहे.