Nashik Fire: नाशिकमध्ये अग्नितांडव! 3 घरं, 2 दुकानं जळून खाक

Nashik Fire :  जुने नाशिक परिसरात एका घराला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, या भीषण आगीत 50 हून अधिक वाहने जळून खाक झाली आहे.

आग इतकी भीषण होती की, परिसरातील तीन घरे आणि दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत गोदामात उपस्थित असलेल्या सुमारे पन्नास दुचाकी जळून खाक झाल्या. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले मात्र अनेक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

माहितीनुसार, केदारे चौकातील एका घरात  सकाळी साडेसात वाजता आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत गोदामात असलेल्या 50 हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. या आगीत तीन नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीचे कारण सध्या समजू शकलेले नाही.

Leave a Comment