Financial Work : संपूर्ण वर्षभरातील मार्च महिना आर्थिक कामांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. कारण या महिन्यात अनेकजण बँकेशी निगडित किंवा इतर संस्थांसंबंधित मोठे आर्थिक व्यवहार केले जातात. तुम्ही या महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या.
जारी करा टीडीएस प्रमाणपत्र
करदात्यांना ३१ मार्चपूर्वी टीडीएस प्रमाणपत्र जारी करावे लागणार आहे. टीडीएस प्रमाणपत्रात कर कपातीची माहिती द्यावी लागणार आहे. करदात्यांना फायलिंग स्टेटमेंटमध्ये माहिती द्यावी लागणार आहे.
अपडेटेड आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत
मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी अद्ययावत आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च असून 2020-21 या आर्थिक वर्षात तुम्ही फाइल करताना काही चूक केली असेल, तर तुम्ही अपडेटेड रिटर्नद्वारे फाइल करता येईल.
फास्टॅग केवायसी
हे लक्षात घ्या की तुम्ही अजून फास्टॅग केवायसी पूर्ण केले नसेल, तर हे काम लवकर पूर्ण करा. कारण त्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ असून तुम्ही तसे केले नाही तर तुम्ही १ एप्रिलपासून तुमचा फास्टॅग रिचार्ज करता येणार नाही.
किमान शिल्लक
समजा तुम्ही PPF किंवा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असल्यास तर 31 मार्चपूर्वी त्यात नक्कीच गुंतवणूक करा. ३१ मार्चपर्यंत तुम्ही यात गुंतवणूक केली नसेल तर तुमचे खाते गोठवण्यात येणार आहे.
कर वाचवण्यासाठी करा गुंतवणूक
समजा तुम्ही जुन्या कर पद्धतीचा अवलंब करत असाल, तर आयकर बचतीसाठी तुम्ही ३१ मार्च २०२४ पूर्वी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्हाला 2023-24 या आर्थिक वर्षात कर बचतीचा लाभ घ्यायचा असल्यास विविध कर बचत पर्यायांमध्ये वेळेत गुंतवणूक करा. नाहीतर तुम्हाला कर बचतीचा लाभ घेता येणार नाही.