मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) आज राज्याचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra budget 2022-23) करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत, त्याबाबत माहिती घेऊ या..
कृषी, आरोग्य, दळणवळण, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1,15,215 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. येत्या तीन वर्षात 4 लाख कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी रुपये तरतूद केली आहे. आरोग्यासाठी 5 हजार 244 कोटी रुपये, मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी रुपये, पायाभूत सुविधा व वाहतुकीसाठी 28 हजार 605 कोटी, उद्योग व ऊर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटी रुपये तरतूद केली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे फळपिके आणि महत्वाच्या मसाला पिकांचा समावेश केला आहे. विदर्भ, मराठवाडी आणि उर्वरित राज्यासाठी प्रत्येकी एक अशा एकूण तीन मोबाइल प्रयोगशाळा सुरू करणार.
50 खाटांच्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे व 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता यंत्रे देणार. मोबाइल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देणार. हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची महिला रुग्णालये सुरू करणार.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बस व 103 बस स्टेशन्सच्या आधुनिकीकरणासाठी भांडवली अर्थसहाय्य. शिर्डी, रत्नागिरी, अमरावती व कोल्हापूर विमानतळाची कामे गडचिरोलीला नवीन विमानतळ सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन.
सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 13,340 कोटी रुपयांची तरतूद, वार्षिक योजना 1,50,000 कोटी, आदिवासी विकास 11,199 कोटी रुपये तरतूद.
राज्यात 500 कोटी रुपये खर्च करुन प्रत्येक महसूल विभागात इनोव्हेशन हब उभारण्यात येणार आहे तसेच स्टार्टअप साठी 100 कोटी रुपये निधी तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
Maharashtra Budget Live : विमानांना येणार अच्छे दिन..! पहा, सरकारने काय केल्यात मोठ्या घोषणा..?
Maharashtra Budget Live : सर्वसामान्यांना दिलासा..! CNG बाबत राज्य सरकारने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय..