FIFA Women’s U17 World Cup: Delhi: शेवटी जे अपेक्षित होते तेच झाले. गतविजेत्या स्पेनने (Spain) पुन्हा एकदा फिफा अंडर-17 महिला विश्वचषक (FIFA U-17 Women’s World Cup) जिंकला आहे. नवी मुंबईत (New Mumbai) झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कोलंबियाचा 1-0 असा पराभव केला. कोलंबियाचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली होती. फायनलमध्ये कोलंबियाला (Colombia) आत्मघातकी गोलमुळे पराभव पत्करावा लागला. डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर (DY Patil Sports Stadium) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्याच्या 82 व्या मिनिटाला कोलंबियाची बचावपटू आना मारिया गुझमान झापाटा (Ana Maria Guzman Zapata) हिने आत्मघातकी गोल केला जो अखेरीस निर्णायक ठरला.
स्पेनने 2018 मध्ये अंडर-19 महिला विश्वचषकही जिंकला होता आणि आजही तो पुन्हा एकदा त्यांनीच जिंकला. या लीग सामन्यांमधूनच स्पेनने स्पर्धेत वर्चस्व राखले होते. क गटात असलेल्या या संघाने त्यांच्या गटात अव्वल स्थान पटकावले. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत जपानचा २-१ असा पराभव केला. उपांत्य फेरीत स्पेनने जर्मनीच्या (Germany) बलाढ्य संघाचा 1-0 असा पराभव केला आणि अखेरीस त्याच फरकाने अंतिम फेरीतही विजय मिळवला.
An incredible night to wrap up an incredible tournament! 👏 #U17WWC | #KickOffTheDream pic.twitter.com/CgUO0zghjP
— FIFA Women's World Cup (@FIFAWWC) October 30, 2022
कोलंबियाने केली चांगली कामगिरी
कोलंबियानेही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. क गटात दुसरे स्थान मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. यानंतर टांझानियाचा (Tanzania) ३-० असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. 26 ऑक्टोबर रोजी त्यांनी नायजेरियाचा (Nigeria) पेनल्टी शूटआऊटमध्ये (penalty shootout) 6-5 असा पराभव केला. मात्र आत्मघातकी गोलमुळे उपांत्य फेरीत त्याचा पराभव झाला.
फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेत कोणी काय जिंकले?
स्पेनच्या विकी लोपेझने (Vicki Lopez) या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याला गोल्डन बॉल पुरस्कार (golden ball award) मिळाला. जर्मनीच्या लॉरेन बेंडरने 4 गोल आणि 2 असिस्टसह गोल्डन बूट जिंकला. या स्पर्धेत 32 सामन्यांत एकूण 95 गोल झाले. भारताला या स्पर्धेत एकही गोल करता आला नाही आणि ते तिन्ही साखळी सामने गमावले. भारतीय संघाने तीन सामन्यांत 16 गोल केले. नायजेरिया स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होता, त्याने जर्मनीला हरवून चौथ्या क्रमांकावर ढकलले.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022 Suryakumar Yadav: ‘या’ क्रिकेटरची सर्वत्र वाहवा; पहा कोणी केले या क्रिकेटरचे कौतुक
- ICC T20 World Cup BAN vs ZIM: ‘पाकिस्तानला’ हरवणाऱ्या झिम्बाब्वेला ‘या’ संघाने केले चीत; पहा या रोमहर्षक सामन्याचे वृत्त
- Agriculture News: महागाईतून दिलासा देण्यासाठी काय आहे सरकारची रणनीती; पहा सविस्तर