FD Scheme: बचतीसाठी सध्या ग्राहक मोठ्या प्रमाणात बँकेत एफडीचे स्वरूपात आर्थिक बचत करण्यासाठी प्राधान्य देत आहे.
यातच देशातील अनेक बँकांनी अलीकडेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्याचबरोबर महिलांसाठी विशेष एफडी योजनाही अनेक बँका राबवत आहेत. ज्यामध्ये सामान्य ग्राहकांच्या तुलनेत महिलांना जास्त व्याज मिळत आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांबद्दल सांगणार आहोत.
पंजाब आणि सिंध बँक
या बँकेद्वारे “PSB गृह लक्ष्मी मुदत ठेव योजना” चालवली जात आहे. महिलांना एफडीवर 6.90 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ महिलांना 7.40 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करून खाते उघडू शकता.
श्रीराम फायनान्स बँक
श्रीराम फायनान्स महिलांना मुदत ठेवींवरही आकर्षक व्याज देत आहे. महिलांना FD वर 0.10 टक्के जास्त व्याज मिळत आहे. ज्येष्ठ महिलांना नियमित ठेवींवर 0.50% + 0.10% व्याज मिळत आहे.
इंडियन बँक
या बँकेने अलीकडेच “इंड सुपर 400 डेज” नावाची योजना सुरू केली आहे. या एफडी योजनेंतर्गत महिलांना बँकेकडून 0.05 टक्के अधिक व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ महिलांना 7.65 टक्के तर अति ज्येष्ठ नागरिक महिलांना 7.90 टक्के व्याज मिळत आहे.