FD Rates Hike : गुंतवणूकदारांची चांदी! SBI सह ‘या’ बँका देत आहेत FD वर बंपर व्याज, जाणून घ्या अधिक..

FD Rates Hike : जर तुम्ही एफडी केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण SBI आणि इतर अशा बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त FD वर व्याज देत आहेत.

SBI

स्टेट बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. 15 मे रोजी व्याजदर बदलताना, काही कालावधीसाठी ते 75 bps पर्यंत सुधारित केले असून 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7 टक्के व्याज दिले जातेय. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.

IDFC फर्स्ट बँक

IDFC फर्स्ट बँकेने 15 मे रोजीच त्यांच्या एफडी दरांमध्ये सुधारणा केली असून बँक 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर 3% ते 8% व्याज देत आहे. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर हे व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. या बँकेने दिलेला सर्वोच्च व्याज दर 500 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी 8 टक्के इतका आहे.

डीसीबी बँक

DCB बँकेत FD केली तर तुम्हाला 8.05 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ८.५५ टक्के व्याज मिळेल. हा व्याजदर 19 महिने ते 20 महिन्यांच्या FD वर मिळेल. दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर हे व्याज मिळत आहे. DCB बँकेच्या वेबसाइटनुसार बँकेने 22 मे 2024 पासून त्यांचे दर सुधारित केले आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

हे लक्षात घ्या की उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपर्यंतची एफडी करणाऱ्यांसाठी व्याजदर बदलले आहेत. आता बँकेकडून ४ टक्के ते ८.५ टक्के व्याज मिळत आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला ९.१ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

सिटी युनियन बँक

सिटी युनियन बँकेने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी त्यांच्या एफडी व्याजदरातही सुधारणा केली असून बँक ग्राहकांना ५ टक्के ते ७.२५ टक्के व्याज देत आहे. ४०० दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक ७.२५ टक्के व्याज मिळेल.

आरबीएल बँक

RBL बँकेने देखील त्यांच्या FD दरांमध्ये सुधारणा केली आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर लागू होतील. RBL बँकद्वारे दिले जाणारे सर्वात जास्त व्याज 8 टक्के आहे, जे 18-24 महिन्यांच्या FD साठी मिळेल.

कॅपिटल बँक स्मॉल फायनान्स बँक

याच महिन्यात कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेनेही एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली असून 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरही हे लागू होईल. बँकेकडून 3.5 टक्के ते 7.55 टक्के व्याज मिळेल. तर 400 दिवसांच्या FD वर सर्वात जास्त व्याजदर मिळेल.

Leave a Comment