FD Rate : 15 महिन्यांतच होईल दुप्पट कमाई, ‘ही’ बँक देतेय बंपर व्याज; पहा सविस्तर

FD Rate : अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. असेही काहीजण आहेत जे बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. काही बँका अशा आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा देतात. शिवाय कमी कालावधीत हा परतावा गुंतवणूकदारांना मिळतो. अशीच एक बँक आहे जी आपल्या गुंतवणूकदारांना 15 महिन्यांतच दुप्पट कमाई करण्याची संधी देत आहे.

त्यामुळे आता तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल केला आहे.

व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांसाठी 3.75 टक्के ते 8.50 टक्के व्याजदर देत असून 15 महिन्यांच्या कालावधीसाठी सर्वात जास्त व्याज दर 8.50 टक्के आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीसाठी सर्वात जास्त 9 टक्के व्याजदर आहे. नवीन दर 7 मार्च 2024 पासून लागू होणार आहेत.

व्याज भरण्यासाठी मिळतात खूप पर्याय

1 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी केवळ Platina FD द्वारे ऑफर केलेल्या 0.20 टक्के अतिरिक्त व्याजदरासाठी पात्र असणार आहेत. उज्जीवन SFB साठी उपलब्ध व्याज पेमेंट पर्याय मासिक, त्रैमासिक आणि मुदतपूर्तीवर आहेत, हे लक्षात ठेवा.

त्यामुळे जर तुम्हाला चांगला परतावा तुम्ही या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे यात कोणतीही जोखीम नसते. यातील गुंतवणूक सुरक्षित असते. त्यामुळे आजच या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करा.

Leave a Comment