FD Rate Hike: ‘या’ 6 बँका करणार तुम्हाला श्रीमंत! FD वर देणार सर्वाधिक परतावा

FD Rate Hike :  जर तुम्ही भविष्यासाठी बँकेमध्ये एफडीच्या स्वरूपात गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे.

या लेखात आम्ही तुम्हाला देशातील काही बँकाबद्दल माहिती देणारा जे तुम्हाला एफडीवर जबरदस्त परतावा देतात.

हे जाणुन घ्या की, प्रत्येक बँक एफडीवर वेगवेगळे व्याजदर देते. याशिवाय तुम्ही किती काळ FD करत आहात यावरही व्याजदर अवलंबून असतो.

समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD केल्यास, तीन महिन्यांच्या FD वरील व्याज दर 5.5 टक्के आहे, तर एक वर्षाच्या FD वर, तो 6.8 टक्के इतका वाढतो. आज आम्ही तुम्हाला 5 वर्षच्या एफडीवर देशातील आघाडीच्या बँकांद्वारे ऑफर करण्यात येणाऱ्या व्याजदरांबद्दल अपडेट देणार आहोत.

SBI Bank 

स्टेट बँक ऑफ इंडिया पाच वर्षांच्या FD वर 6.5 टक्के व्याज दर देत आहे तर एक वर्षाच्या FD वर 6.8 टक्के व्याजदर आहे. हे दर 15 मे 2024 पासून लागू झाले आहे.

ICICI Bank

ही खाजगी क्षेत्रातील बँक पाच वर्षांच्या FD वर 7 टक्के व्याजदर देत आहे, तर ती एक वर्षाच्या FD वर 6.7 टक्के व्याजदर देत आहे. हे दर 17 फेब्रुवारीपासून लागू आहे.

HDFC Bank

खाजगी क्षेत्रातील ही सर्वात मोठी बँक पाच वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे, तर एक वर्षाच्या एफडीवर 6.6 टक्के व्याजदर देत आहे. हे दर 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू आहे.

Bank Of Baroda

ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.50 टक्के व्याज दर देत आहे, तर ती एक वर्षाच्या FD वर वार्षिक 6.85 टक्के दर देत आहे. हे दर 15 जानेवारी 2024 पासून लागू आहे.

Kotak Mahindra Bank 

ही खाजगी क्षेत्रातील बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.20 टक्के व्याजदर देत आहे, तर एका वर्षाच्या FD वर 7.10 टक्के व्याज दिले जात आहे. हे दर 27 फेब्रुवारी 2024 पासून लागू आहे.

Punjab National Bank

ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.5 टक्के व्याज देत आहे, तर एक वर्षाच्या FD वर 6.8 टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर 12 एप्रिल 2024 पासून लागू आहे.

Leave a Comment