FD Rate : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! या बँकेच्या FD वर मिळतंय बंपर व्याज

FD Rate : अनेकजण बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. अनेक बँका आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देते. असे असल्याने गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात वाढ होते. अशातच आता 500 दिवसांच्या एफडीवर एक बँक बंपर व्याज देत आहे. जाणून घेऊयात सविस्तर.

व्याजदरात बदल केल्यानंतर, आता IDFC फर्स्ट बँक एफडी सर्वसामान्य नागरिकांना ३.० टक्के ते ८.० टक्के वार्षिक व्याज देत आहे. तर त्याच वेळी, ही बँक आपल्या सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याज देत आहे. अशा वेळी ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ३.५० ते ८.५० टक्के वार्षिक व्याज देत आहे. 500 दिवसांच्या कालावधीसह FD वर जास्तीत जास्त व्याज उपलब्ध असून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याजदरात बदल केला आहे.

जाणून घ्या IDFC फर्स्ट बँक एफडी दर

ही बँक 7 ते 14 दिवसांच्या FD वर वार्षिक 3 टक्के दराने व्याज देत असून जरी तुम्ही 15 ते 29 दिवस आणि 30 ते 45 दिवसांसाठी FD केली तरीही तुम्हाला 3 टक्के व्याज मिळेल. बँक 46 ते 90 दिवस आणि 91 ते 180 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.50 टक्के दराने व्याज देत असून बँक 181 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75 टक्के व्याज देत आहे. एका वर्षासाठी FD केली तर तुम्हाला 6.50 टक्के व्याज मिळेल. एक वर्ष, एक दिवस ते ४९९ दिवसांच्या एफडीवर ७.५० टक्के व्याज दिले मिळेल. ५०० दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना ८ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ८.५० टक्के व्याज देत आहे.

भरावा लागेल व्याजावरही कर

FD मधून मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र असून तुम्ही एका वर्षात FD वर जे काही व्याज कमवाल ते तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडण्यात येते. FD वर मिळणारे व्याज उत्पन्न “इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न” मानले जात असून जर तुमचे उत्पन्न एका वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर बँक मुदत ठेवींवर टीडीएस कापत नाही.

Leave a Comment