FD Interest Rates : अनेकजण बँकेत गुंतवणूक करतात. पण काही अशा बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा देतात. सध्या अशा काही बँका आहेत ज्या आपल्या FD वर ग्राहकांना सर्वात जास्त व्याज देत आहेत.
समजा तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल किंवा या बँकेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बॅंकेने FD वर व्याजदरात वाढ केली आहे. ग्राहकांना एफडीवर जास्त व्याजदराचा लाभ मिळेल.
बँक देत आहे FD वर 7.75% व्याज
एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. बँक एफडीवर ७.७५% व्याजदराचा लाभ ग्राहकांना देत असून ही बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसह FD सुविधा देते.
मिळेल जास्त व्याजदर
HDFC बँकेच्या ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. बँकेने एफडी दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने त्यांच्या अधिकृत साइटवर व्याजदर वाढवण्याबाबत माहिती दिली आहे.
ग्राहकांना 8 महिन्यांपासून ते 20 महिन्यांपर्यंतच्या कालावधीवर जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. तर सामान्य गुंतवणूकदारांना एफडीवर ७.२५ टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळेल.
एखाद्याने 5 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीची FD केली तर त्याला 7.75 टक्के व्याजाचा लाभ मिळेल. पण, या टक्केवारीच्या व्याजदराचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळेल. सामान्य गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळेल.
7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 3.5 टक्के ते 7.75 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. तसेच 18 महिने ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD ला 7 ते 7.25 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.