FD Interest Rates : गुंतवणुकीसह मजबूत परतावा पाहिजे? ‘या’ बँका FD वर देत आहेत 9.60% पर्यंत व्याज

FD Interest Rates : अनेकजण चांगल्या परताव्यासाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. काही बँका अशा आहेत ज्या गुंतवणुकीसह मजबूत परतावा देत आहेत.

एफडीमध्ये एक मोठी रक्कम जमा केली तर तुम्हाला भविष्यात अधिक चांगल्या रिटर्न्सचा फायदा मिळेल. सरकारी बँकांव्यतिरिक्त, अनेक एफडी योजना खाजगी बँकांद्वारे देखील ऑफर करण्यात येतात. तर, अशा अनेक वित्तीय बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर 9.60% पर्यंत व्याज देत आहेत.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांपासून गुंतवणुकीपर्यंत विविध बँकिंग सेवा पुरवत असून सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या मुदत ठेवींवर 8.51 टक्के व्याज देण्यात येत आहे आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.11 टक्के व्याज देण्यात येत आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक FD वर 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत असून 888 दिवसांच्या FD वर, सामान्य ग्राहकांना 8.50% व्याज मिळते आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9% व्याज दिले जात आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सामान्य ग्राहकांना सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून 9.10% पर्यंत व्याजदर मिळतात. तर, ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.60% पर्यंत व्याजदराचा लाभ दिला जात असून हा व्याजदर ५ वर्षांच्या एफडीवर दिला जातो.

ESAF स्मॉल फायनान्स बँक

ESAF स्मॉल फायनान्स बँक FD वर 9 टक्के पर्यंत व्याज देत असून बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर 8.50 टक्के व्याज दिले जाते आणि 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9 टक्के व्याज देण्यात येत आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक 9.50% व्याज देत असून बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1001 दिवसांच्या मुदत ठेवींवर 9 टक्के व्याज दिले जाते आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% पर्यंत व्याज देण्यात येत आहे.

Leave a Comment