FD interest rate : अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित असते, त्यामुळे अनेकजण बँक एफडीमध्ये पैसे गुंतवतात. काही बँका अशा आहेत ज्या आपल्या गुंतवणुकदारांना सर्वात जास्त परतावा देत आहेत.
SBI बँक ज्येष्ठ नागरिकांना FD दर
देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी SBI 46 दिवस ते 179 दिवसांमध्ये परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 6 टक्के व्याज देत असून नुकतेच SBI ने या कालावधीतील व्याजदरात 75 आधार अंकांची वाढ केली आहे. व्याजदर 5.25 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत.
या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 180 दिवस ते 210 दिवसांच्या FD वरील व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांनी 25 आधार अंकांनी वाढवला आहे. तसेच 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 6.50 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांनी 25 आधार अंकांनी वाढवला आहे.
कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना FD दर
कॅनरा बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर 4 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत असून बँक 444 दिवसांच्या FD वर सर्वात जास्त 7.75 टक्के व्याज देत आहे. नवीनतम दर 19 फेब्रुवारी 2024 पासून लागू आहेत.
PNB बँक ज्येष्ठ नागरिकांना FD दर
PNB बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 4 टक्के ते 7.75 टक्के परतावा देत असून बँक आपल्या गुंतवणूकदारांना 400 दिवसांच्या FD वर सर्वाधिक 7.75 टक्के परतावा देत आहे. हे दर 12 एप्रिल 2024 पासून लागू केले आहेत.
Axis बँक ज्येष्ठ नागरिकांना FD दर
ॲक्सिस बँक देखील ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर चांगले परतावा देत असून बँकेकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 3.50 टक्के ते 7.85 टक्के परतावा दिला जात आहे. बँक 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वात जास्त 7.85 टक्के परतावा देत आहे.
ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना FD दर
ICICI बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.50 ते 7.75 टक्के व्याज देत असून बँक 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर गुंतवणूकदारांना सर्वात जास्त 7.75 टक्के परतावा देत आहे.
एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना FD दर
HDFC बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.50 टक्के ते 7.75 टक्के परतावा देत असून बँक 18 महिने ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वात जास्त 7.75 टक्के परतावा देत आहे. नवीनतम दर व्याज 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू आहे.