FD Interest Rate : सध्या अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी सर्वात जास्त परतावा देतात. अशातच आता काही बँकांनी FD व्याजदरात मोठे बदल केले आहेत. याचा ज्येष्ठ नागरिकांना खूप फायदा होणार आहे.
आरबीएल बँक
RBL बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी FD व्याजदर सुधारित केले असून हे व्याजदर 1 मे 2024 पासून प्रभावी आहेत. RBL बँक 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वात जास्त 8 टक्के व्याजदर देते. त्याच FD कालावधीवर, ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के म्हणजे 8.50 टक्के अतिरिक्त व्याजदर मिळत आहे. अति ज्येष्ठ नागरिक (80 वर्षे आणि त्यावरील) 0.75 टक्के म्हणजेच 8.75 टक्के अतिरिक्त व्याजदरासाठी पात्र आहेत.
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी FD व्याजदर सुधारित केले असून हे दर 6 मे 2024 पासून लागू होणार आहेत. हे बँक सर्वसामान्य नागरिकांना ३.५ ते ७.५५ टक्के दराने व्याज देत असून ही बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ टक्के ते ८.०५ टक्के व्याजदर देत आहे. सर्वात जास्त व्याज 400 दिवसांच्या कालावधीवर देण्यात येत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी त्यांच्या FD व्याजदरांमध्ये सुधारणा केली असून हे दर 1 मे 2024 पासून लागू होतील. या दुरुस्तीनंतर बँक सामान्य नागरिकांना ४ टक्के ते ८.५० टक्के व्याजदर देण्यात येत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.६० टक्के ते ९.१० टक्के व्याजदर बँक देत असून 2 वर्षे ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.10 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
सिटी युनियन बँक
सिटी युनियन बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी एफडी व्याजदर सुधारित केले असून हे FD व्याजदर 6 मे 2024 पासून प्रभावी आहेत. बँक सामान्य नागरिकांसाठी 5 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देत आहे. 400 दिवसांच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.