FD Interest Hike : गुंतवणूकदारांची चांदी! ‘या’ बँका देताहेत FD वर 8 टक्के व्याज, जाणून घ्या

FD Interest Hike : काही बँका अशा आहेत आपल्या गुतंवणूकदारांना FD वर सर्वात जास्त व्याज मिळेल. जर तुम्हीही या बँकेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आता सर्वात जास्त होईल.

पंजाब अँड सिंध बँक एफडी योजना

हे लक्षात घ्या की पंजाब अँड सिंध बँक ग्राहकांना 222 दिवस, 333 दिवस आणि 444 दिवसांचे विशेष एफडी व्याज दर देत असून विशेष FD वर जास्तीत जास्त 8.05 टक्के व्याजदर मिळत आहे. तर बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक २२२ दिवसांच्या एफडीवर ७.०५ टक्के व्याज, ३३३ दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के आणि ४४४ दिवसांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज देत आहे. तसेच ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवसांच्या एफडीवर ८.०५ टक्के व्याज उपलब्ध करून देत आहे.

इंडियन बँकने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणली असून बँक त्यांच्या ग्राहकांना 300 आणि 400 दिवसांची FD ऑफर करत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला इंड सुपर 400 आणि इंड सुप्रीम 300 दिवस नावाच्या FD योजनांमध्ये 30 जून 2024 पर्यंत गुंतवणूक करता येईल.

बँकेच्या वेबसाइटनुसार, विशेष मुदत ठेव उत्पादन Ind Super 300 days 1 जुलै 2023 रोजी लाँच केले आहे. 5000 रुपये घेऊन तुम्हाला या FD वर 300 दिवसांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येईल. बँक 7.05 टक्के ते 7.80 टक्के व्याजदर देत असून बँक सर्वसामान्यांना 7.05%, ज्येष्ठ नागरिकांना 7.55% आणि अति-ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व्याजदर देत आहे.

IDBI बँक विशेष मुदत ठेव योजना

IDBI बँक आपल्या ग्राहकांना विशेष मुदत ठेवी देत ​​आहे. IDBI बँक 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसांची विशेष FD देत आहे. यात ७.७५ टक्के दराने व्याज मिळते. ही विशेष योजना 30 जून 2024 पर्यंत ग्राहकांना देण्यात येत आहे.

IDBI उत्सव FD योजना

IDBI बँक 375-दिवसीय उत्सव FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज देत असून नियमित ग्राहक, NRI आणि NRO ग्राहक 375 दिवसांच्या FD वर 7.10% व्याज देत आहेत. या FD मधील पैसे वेळेपूर्वी काढण्याचा किंवा बंद करण्याचा पर्याय बँक उपलब्ध करून देते.

Leave a Comment