FD Interest Hike : अनेकजण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडीमध्ये गुंतवणूक करत असतात. जर तुम्ही देखील या बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आता FD वर सर्वाधिक व्याज देत आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
स्टेट बँक ऑफ इंडियाची विशेष योजना
भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या ग्राहकांना विशेष योजना ऑफर करत असून या शानदार योजनेत बँकेच्या ग्राहकांना 7.90% पर्यंत व्याजदराचा लाभ मिळतो. सर्वोत्कृष्ट योजनेत ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.90% व्याज मिळते. जाणून घेऊयात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वोत्तम योजनेबद्दल.
अमृत कलश आणि बेस्ट टू फिक्स्ड डिपॉझिट योजना स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफर करत असून समजा तुम्ही बँकेची सर्वोत्तम योजना स्वीकारली, तर तुम्हाला जास्त व्याजदराचा लाभ मिलेल. हे लक्षात घ्या की या योजनेत गुंतवणूकदारांना मुदतीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा मिळू शकत नाही.
..तर लागू होणार शुल्क
ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम योजना ही नॉन-कॉलेबल योजना असून बँकेच्या ग्राहकांना वेळेपूर्वी पैसे काढण्याची सुविधा मिळत नाही. जर गुंतवणूकदाराने वेळेपूर्वी पैसे काढले तर त्याला शुल्क भरावे लागणार आहेत.
जाणून घ्या योजनेचे फायदे
हे लक्षात ठेवा की या बँकेची सर्वोत्तम योजना फक्त 1 किंवा दोन वर्षांसाठी आहे ज्यामुळे तुम्हाला कमी वेळेत जास्त निधी मिळू शकेल. वेगवेगळ्या कालावधीत पैसे जमा केल्यावर विविध टक्केवारीवर व्याज मिळेल. तसेच या योजनेतील गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळतो.
व्याज दर
या योजनेत, सामान्य लोकांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी EFI वर 7.10 टक्के व्याज दिले जाते.
तर ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी EFI वर 7.60 टक्के व्याज दिले जाते.
तसेच सामान्य लोकांनी 2 वर्षांच्या कालावधीसह गुंतवणूक केली तर 7.4 टक्के व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांनी 2 वर्षांच्या कालावधीसह गुंतवणूक केली तर 7.90 टक्के व्याज दिले जाते.
गुंतवणूक करणाऱ्यांना किती मिळणार व्याज?
तुम्ही या योजनेत 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणूक केली तर या FD योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना एक वर्षाच्या कालावधीसाठी 7.30 टक्के व्याज मिळेल. इतकेच नाही तर 2 वर्षांच्या कालावधीसाठी 7.40 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी 7.80 टक्के आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी 7.90 टक्के व्याज दिले जात आहे.