Faulty Gear Box : कारचा गिअर बॉक्स खराब झाल्याचे कसे ओळखाल? ‘या’ गोष्टींकड दुर्लक्ष करू नका

Faulty Gear Box : वाहनाची काळजी घेणे नेहमीच महत्वाचे ठरते. वाहनांच्या देखभालीकडे (Faulty Gear Box) दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम वाहन खराब होण्यात होतो. तेव्हा वाहनाची काळजी घेणे जास्त महत्वाचे ठरते. तुम्हाला तुमच्या कारमध्ये काही विशेष सिग्नल मिळत असतील तर त्यामुळे वाहनाच्या गिअर बॉक्स (Gear Box) मध्ये काही खराबी असू शकते हे लक्षात घेतले पाहिजे.

कारच्या दीर्घायुष्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक (Car Care Tips) आहे पण, तरीही निष्काळजीपणामुळे कार खराब होण्याची शक्यताही राहतेच. कारमधून विशिष्ट प्रकारचे सिग्नल मिळाल्यास गिअर बॉक्समध्ये काहीतरी खराबी असू शकते याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे. त्यामुळे आज आम्ही अशाच काही लक्षणांची माहिती देणार आहोत ज्याद्वारे तुमच्या लक्षात येईल की वाहनाच्या गिअर बॉक्स मध्ये काहीतरी दोष निर्माण झाला आहे.

Car Resale Value : जुनी कार जास्त किंमतीत विकायचीय? मग ‘या’ टिप्स पक्क्या लक्षात ठेवाच!

Faulty Gear Box

गिअर अटकणे

कार चालवताना वेळेवर गिअर्स बदलणे महत्त्वाचे ठरते. परंतु जर तुमच्या कारमध्ये गिअर्स अडकू लागले तर ते गिअर बॉक्स खराब झाल्याचे लक्षण आहे असे झाल्यास लवकरात लवकर वाहन चांगल्या मेकॅनिककडून दुरुस्त करून घेतले पाहिजे. गिअरबॉक्सचा हा प्रॉब्लेम जर तुम्ही दुर्लक्षित केला तर त्याचा परिणाम कारचा एकूणच परिस्थितीवर होऊ शकतो.

शक्ती कमी होणे

गिअर बदलताना वाहनाची शक्ती कमी झाल्यास गिअर बॉक्स निकामी होण्याचा धोका वाढतो. साधारणपणे जेव्हा जेव्हा वाहनात गिअर बदलला जातो तेव्हा वाहनाची शक्ती वाढते. परंतु गिअर बॉक्समध्ये दोष असल्यास गिअर बदलताना शक्ती वाढण्याऐवजी काही काळ कमी होतो त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका अशी परिस्थिती निर्माण झाल्यास गिअर बॉक्समध्ये दोष आहे हे समजून घ्या.

Faulty Gear Box

क्लच खराब होणे

क्लच काम करत नसला तरी गिअर बॉक्समध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. गिअर बदलल्यानंतर क्लच नीट काम करत नसेल किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज करत असेल तर कार मेकॅनिक कडून दुरुस्त घेऊन करून घेणे गरजेचे ठरते.

Worlds Car Market मध्ये ‘ही’ कंपनी आहे दादा; पहा कोणत्या कारला आहे जगाची पसंती

कार सुरू होण्यास जास्त वेळ

कार सुरू झाली की ती अगदी सहज सुरू होते मात्र कारचा गिअर बॉक्स खराब असेल तर कार सुरू होण्यास वेळ लागू शकतो. याशिवाय गिअर टाकल्यानंतर गाडी पुढे किंवा मागे नेण्यात देखील अडचणी येत असतील तर आधी गिअर बॉक्स तपासून पाहिला पाहिजे. गिअर बॉक्समध्ये खराबी असल्यास शक्यतो अशा अडचणी निर्माण होतात. यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो. अशी वेळ येऊ नये यासाठी अशी परिस्थिती उद्भवल्यास कार दुरुस्त कारचा गिअर बॉक्स दुरुस्त करून घेणे गरजेचे ठरते.

Leave a Comment