Fatty Liver : कायमची निघून जाईल यकृतातील चरबी, घरच्या घरीच करा ‘हे’ उपाय

Fatty Liver : यकृत हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असून ते शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. अन्न पचवण्यात यकृताची महत्त्वाची भूमिका असते. ज्या लोकांचे यकृत नीट काम करत नाही, त्यांना पचनाशी निगडित समस्या कायम राहतात. अनेकजण यकृतातील चरबी घालवण्यासाठी अनेक उपाय करतात.

या समस्येमध्ये यकृताभोवती चरबी जमा होते. समजा चरबी जास्त प्रमाणात वाढली तर अनेक समस्या निर्माण होतात. फॅटी लिव्हरमुळे ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि अनेक अवयव निकामी होण्याची दाट शक्यता असते.

अशा वेळी हे काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने फॅटी लिव्हरची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल. परंतु हे उपाय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जाणून घ्या फॅटी यकृताचे कारण

  • लठ्ठपणा
  • जास्त प्रमाणात अल्कोहोल सेवन
  • कौटुंबिक इतिहास
  • चरबीयुक्त अन्न आणि मसालेदार अन्न
  • दीर्घकालीन औषधांचा वापर
  • मधुमेह
  • हिपॅटायटीस

या घरगुती उपायांनी मिळेल आराम

कारल्याचा रस

कारल्यामध्ये आढळणारे घटक फॅटी लिव्हरच्या समस्या टाळण्यास मदत करत असतात. जर तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असल्यास आहारात कारल्याची भाजी किंवा रस घ्या. तुम्ही नियमित याचे सेवन केले तर त्याचा तुम्हाला काही दिवसात फायदा होऊ शकतो.

कोबी रस

कोबीचा रस फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यास खूप मदत करू शकतो.

काकडी आणि टोमॅटो रस

काकडी आणि टोमॅटोचा रस फॅटी लिव्हरच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.

ताक सेवन

दुपारच्या जेवणात ताक प्या आणि त्यात मीठ, हिंग, जिरे आणि काळी मिरी मिसळा. फॅटी लिव्हरची समस्या यामुळे दूर होईल.

मेथी दाणे

मेथीचे दाणे हे फॅटी लिव्हर बरे करण्यास मदत करतात. मेथीचे दाणे पाण्यात भिजवून तुम्ही रोज सेवन केले तर तूम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल.

Leave a Comment