Fashion Mistakes : वय वाढत चालले तरी प्रत्येकालाच (Fashion Mistakes) तरुण अन् हँडसम दिसावे अशी इच्छा असतेच. कधीकधी मेकअप आणि अन्य गोष्टींमुळे तुम्ही कमी वयाचे दिसू शकता. तर कधी जास्त वयाचेही दिसू लागता. फॅशनच्या काही चुकांमुळे असे घडू शकते त्यामुळे तुमचे वय कमी असले तरी तुम्ही जास्त वयाचे दिसू लागता.
जर तुम्ही सुद्धा अशाच काही चुका करत असाल तर त्या तत्काळ बंद करा. या चुका बंद केल्या तर तुम्ही कमी वयात मोठे दिसणार नाहीत. याबाबत आता आपण अधिक माहिती जाणून घेऊ या..
तुमच्या शरीराच्या आकारापेक्षा जास्त मोठे किंवा ढगळ कपडे वापरल्यास तुम्ही नक्कीच मोठे दिसाल. जर तुम्ही असे करत असाल तर हे आधी बंद करा. आपल्या साइजचेच कपड्यांची निवड करा. जर तुम्ही जास्त साइजचे कपडे वापरले तर असेच वाटेल की तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे करत आहात.
जर तुम्ही चष्म्याची फ्रेम चुकीची वापरली तर त्याचाही परिणाम जाणवतो. तुम्ही कितीही चांगले कपडे घातले असतील अन् मेकअप केला असेल तरीही तुम्ही म्हातारेच दिसाल. त्यामुळे चष्म्याची योग्य फ्रेम निवड करणे गरजेचेच आहे.
तुमची कपड्यांची निवडही योग्य हवी. कारण ज्या पद्धतीने कपडे तुम्ही वापरताल त्यानुसार तुमचे व्यक्तिमत्व दिसते. फर्स्ट इम्प्रेशन नेहमीच महत्वाचे असते. आणि ते तुमच्या कपड्यांवरूनच ठरते. त्यामुळे आपल्या वयाला साजेसे आणि शरीराच्या आकारानुसार कलरफुल कपड्यांची निवड केलेली बेस्ट राहिल.