सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार (Regional Meteorological Center, Mumbai, Indian Meteorological Department) सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक २२ जून ते २६ जून २०२२ दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला समितीने (ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र , मोहोळ , सोलापूर) असे म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) (Central Maharashtra Division (Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur)) दिनांक २६ जून ते ०२ जुलै २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. (Rural Agriculture Meteorological Service, District Krishi Meteorological Center, Krishi Vigyan Kendra, Mohol, Solapur)) अशावेळी पुढीलप्रमाणे पिक सल्ला समितीने दिलेला आहे.

सोयाबीन (Soybean / Soyabean) पेरणीची तयारी वाणांची निवड: जे. एस.-३३५, फुले कल्याणी (डी.एस.२२८), फुले अग्रणी (के. डी.एस.३४४), जे. एस ९०३५ , जे. एस ९५६०, एम. ए. सी. एस. ११८८, के. एस. १०३, फुले किमया (के. डी.एस.७५३), फुले संगम (के. डी.एस.७२६) फुले दुर्वा (के. डी.एस.९९२), एम. ए. यू. एस. १५८, एम. ए. यू. एस. ६१२ आणि समृद्धि (एम. ए. यू. एस. ७१)  या वाणांची निवड करावी.

बियाणे: सलग पेरणीसाठी ७५-८० किलो प्रति हेक्टर तर टोकण करण्यासाठी ४५ – ५० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया: (seed treatment) जमिनीतून प्रसार होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाणास थायोफिनेट मीथाईल ५० ग्रॅम प्रती लिटर + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५० ग्रॅम एफ.एस.प्रती लिटर किंवा अॅझोक्सिस्ट्रोबीन २.५% + थायोफिनेट मिथाईल ११.२५% + थायोमिथोक्झाम ३०% एफ.एस. १० मिली प्रति १० किलो बियाण्यास बीजप्रक्रीया करावी त्यामुळे खोड माशी पासून रोपावस्थेत पिकाचे संरक्षण होईल.

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

तूर (tur) पेरणीची तयारी वाणांची निवड: विपुला, फुले राजेश्वरी, बी एस एम आर-८५३, बी एस एम आर-७३६, बी डी एन-७११, बी डी एन-७१६ आणि पि.के.व्ही.तारा या वाणांची निवड करावी.

बियाणे प्रमाण: मध्यम मुदतीच्या राजेश्वरी, विपुला व बी डी एन-७११ या वाणासाठी हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पुरते. उशिरा येणार्‍या आणि जास्त अंतरावर लावावयाच्या वाणासाठी हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे टोकण पद्धतीसाठी पुरेशे होते.

बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ४ ग्रॅम कार्बोक्झिन ३७.५ % + थायारम ३७.५% डब्ल्यु.एच.सी                                                                                                                                                                                           बिजप्रक्रिया करावी. यानंतर प्रत्येकी २५० ग्रॅम रायझोबियम व पी.एस.बी. जिवाणू संवर्धन १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

मुग आणि उडीद (moong / moog and urad / udid) पेरणीची तयारी वाणांची निवड: मूग: वैभव,पी.के.व्ही ए.के.एम-४,बी.एम.२००३-२, बी.एम.२००२-१, बी. पी.एम. आर -१४५, उत्कर्षा, फुले चेतक हे वाण खरीपासाठी उपयुक्त आहे.

उडीद : बी.डी.यू -१.आणि टी.ए.यू. – १

बियाणे प्रमाण: १५ ते २० किलो/हेक्टरी

बीजप्रक्रिया: पेरणीपुर्वी प्रती किलो बियाण्यास ५ ग्राम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व त्यानंतर २५ ग्राम रायझोबियम जिवाणूची पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी. मूग,उडीद या पिकांच्या बियाण्यासाठी चवळी गटाचे रायझोबियाम जिवाणू संवर्धन वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियममुळे मुलावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

मका  (maize grain) पेरणीची तयारी पेरणीची पद्धत : टोकन

टोकणीचे अंतर :७५ सेमी X २० सेमी – उशिरा व मध्यम कालावधीच्या वाणासाठी

: ६० सेमी X २० सेमी – कमी कालावधीच्या वाणासाठी

बियाणे :  १५ ते २० किलो प्रती हेक्टर

बीजप्रक्रिया: २ ते २.५ ग्राम थायरम प्रती किलो बियाण्यास पेरणीपुर्वी लावावे. तसेच पेरणीपूर्वी अझॅटोबॅक्टर वापरावे.

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

सूर्यफूल (sunflower) पेरणीची तयारी वाणांची निवड: सुधारित जाती – फुले भास्कर ,मॉडर्न, भानू संकरीत वाण- के.बी.एस.एच.१, एल.एस.एफ.एच-१७१, एल.एस.एफ.एच-३५, एल.एस.एफ.एच-०८, के.बी.एस.एच.-४४, एम.एस.एफ.एच-१७ आणि फुले रविराज या वाणांची निवड करावी.

बीजप्रक्रिया: केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झिल ३५ डब्ल्यू.एस. प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच विषाणूजन्य (नॅक्रॉसिस) रोगाच्या प्रतिबंधासाठी थायामिथोक्झाम ३०% एफ.एस.१० मिली प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू खत २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

भुईमूग (groundnut) पेरणीची तयारी वाणांची निवड: एसबी- ११, जेएल -२४ (फुले प्रगती), टी.ए.जी. -२४, टी.जी -२६, जेएल-५०१, फुले उन्नती, जेएल- ७७६ (फुले भारती), केडिजी-१२३(फुले मोरणा), केडिजी-१२८(फुले वारणा) आणि जे.एल.१०८५ (फुले धनी)

बियाणे: भुईमुगाचे वाणनिहाय बियाणे प्रति हेक्टरी खालीलप्रमाणे वापरावे.

१०० किलो : एसबी- ११, टी.ए.जी. -२४, टीजी -२६, जेएल-५०१

१२० ते १२५ किलो:  फुले प्रगती, फुले उन्नती, फुले भारती, फुले वारणा, फुले मोरणा

बीजप्रक्रिया: बियाण्यापासून प्रादुर्भाव होणार्‍या व रोपावस्थेत येणार्‍या रोगापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपुर्वी प्रती किलो बियाण्यास ५ ग्राम थायरम किंवा २ ग्राम कार्बेन्डीझम किंवा ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्राम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळनारे जिवाणू संवर्धक (घनरूप किंवा द्रवरूप) चोळावे.  बिजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.

बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक तदनंतर कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

ऊस (sugar cane) बांधणी सुरू ऊस पिकास मोठ्या बांधनीच्या वेळी १०० किलो नत्र (२१७ किलो युरिया ), ५५ किलो स्फुरद (३४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५५ किलो पालाश ( ९२ किलो म्युरेट ऑफ पोटाश) अशी प्रती हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

हुमणी :वळवाचा पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सायंकाळी बाभूळ, कडूनिंब, व बोर या झाडांवर जमा होतात. अगोदर मादी भुंगेरे व त्यानंतर नर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. या झाडांवर बसून ते झाडांचा पाला खातात. अश्या झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भूंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.

भाजीपाला (vegetable farming) रोप वाटिका तयार करणे पाण्याची खात्रीशीर सोय असल्यास कांदा, वांगी, मिरची, टोमॅटो, ई. पिकांची लागवड खरीप हंगामामध्ये करण्यासाठी गाडी वाफ्यावर रोपे तयार  करावीत.
डाळिंब (pomegranate) आंबिया बहार

फळ वाढ, फळ पक्वता व रंग येणे

उच्च तापमानाचा ताण अंशतः भरून काढण्यासाठी अमायनो अॅसिड २ ते २.५  मिली प्रती लिटर ची फवारणी करावी.

फांद्यावर फळांचा भार असल्याकारणाने वाकलेल्या फांद्या बांबूने ताणलेल्या तारेला सुतळीने बांधाव्यात किंवा परिस्थितीनुसार जी आय / एम एस स्ट्रक्चरला बांधाव्यात.

केळी (banana cultivation)   झाडे पडू नयेत म्हणून व वजनाने मोठ्या असलेल्या घडास गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलिप्रोपिलीनच्या पटट्यांच्या सहहाय्याने झाडांना/घडाना आधार किंवा टेकू द्यावा. केळीच्या बुंध्याजवळ वाढणारी पिल्ले नियमित कापवीत तसेच केळीवरील जुनी वाळलेली व रोगट पाने कापून बाग स्वच्छ ठेवावी.

 

Share.

Leave A Reply

Exit mobile version