Farming Tips: सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (Regional Meteorological Centre Mumbai) यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) दिनांक ०८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची तसेच आपल्या जनावरांची काळजी घ्यावी व जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असे आवाहन ग्रामीण कृषि मौसम सेवा-जिल्हा कृषि हवामान केंद्र (कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर) यांनी केले आहे. (Madhya Maharashtra (Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur and Kolhapur) division.) यासह पीक निहाय सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
ऊस | आडसाली ऊस लागवड (Adsali Sugarcane Planting) | आडसाली ऊस पिकाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत करावी. उसासाठी ७.५ ते ८ सामू असलेली मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. वाणांची निवड: को-८६०३२ (निरा), कोएम-०२६५ (फुले २६५), को. व्ही. एस. आय. – ९८०२ (शरद – १), व्ही. एस. आय. – १२१२१(व्ही. एस. आय. –०८००५) को-४१९ , को-७४०, कोएम -८८१२१ (कृष्णा), या वाणांची निवड करावी. एक डोळा रोपापासून (३० ते ४५ दिवस वयाच्या रोपांची ) ऊस लागवड करावी. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत ऊस लागणीस ३० ते ४५ दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तण नियंत्रण, खते,देखरेख यांची बचत होते. काही वेळेस अगोदरचे पिक काढणीस उशीर होतो अश्या वेळेस रोपे तयार करून वेळेवर उसाची लागवड करता येते. बेण्याद्वारे लागवड करावयाची असल्यास बेणे मळ्यात वाढवलेले ९ ते १० महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवांशिक दृष्ट्या शुद्ध ऊस बेणे वापरावे. बुरशीजन्य रोग व खवले किड याच्यापासून प्रतिबंधासाठी ऊस बेणे लागणीपूर्वी १०० लिटर पाण्यात डायमेथोएट ३० % प्रवाही २६५ मिली मिसळून १० मिनिटांसाठी बुडवून ठेऊन बेणे प्रक्रिया करावी. अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ऊसाच्या टिपऱ्या ३० मिनिट बुडवून नंतर लावाण करावी. त्यामुळे नत्रखतामध्ये ५०% ची तर स्फुरदखतामध्ये २५ % बचत होते. |
सोयाबीन (Soybean Vegetative growth stage) | वाढीची अवस्था | स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत. पीक उगवणी नंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी करावी. व नंतर खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर २१ दिवसांनी प्रती हेक्टरी इमॅझेथायपर क्रियाशील घटक ०.१ ते ०.१५ किलो ५०० ते ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणावर फवारावे. |
तूर (Pigeon Pea) | वाढीची अवस्था | शेंगा पोखरणार्या आळीच्या नर पतंगांणा आकर्षित करण्याकरिता १० कामगंध सापळे प्रती हेक्टरी लावावेत. तूर पिकात पेरणीनंतर उगवण न झालेल्या रिकाम्या जागी नांग्या भरण्याची कामे करावीत. पेरणी झालेल्या क्षेत्रात योग्य रोपांची संख्या राखण्यासाठी पिकाची विरळणी करावी जेणेकरून जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्यसाठी पिकांची परस्परांशी स्पर्धा होणार नाही. |
मुग व उडीद (Black gram & Green gram) | वाढीची अवस्था | रस शोषणार्या किडीच्या नियंत्रणासाठी २ मिली इमेडॉक्लोप्रिड १७.८ % ईसी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. |
मका (Maize) | पीक वाढीची अवस्था | मका पिकास पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी नत्र ४० किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात नत्र द्यावे. पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० % पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी खालील पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची एकदा फवारणी घ्यावी. क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५ एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी. किंवा स्पीनोटोराम ११.७ % एस सी ०.५ मिली प्रती लीटर पाणी. किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ % एस जी ०.४% ग्राम प्रती लीटर पाणी. |
बाजरी (Bajra / Bajari / Pearl Millet) | वाढीची अवस्था | खोड कीड किंवा खोड माशीच्या नियंत्रणासाठी १४ मिलिमेलॅथीऑन ५० % प्रवाही प्रती १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ व निरभ्र वातावरणात फवारणी करावी. |
टोमॅटो (Tomato) | पांढरी माशी, फुलकिडे, मावा व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ३ मिली किंवा थायोमेथोक्झाम २५ डब्ल्यु. जी. ४ ग्रॅम + कॉपर ओक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून साध्या हात पंपाने फवारणी करावी. अधून-मधून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. | |
डाळिंब (Pomegranate Bahar: Mrig Fruit enlargement stage) | बहार: मृग फळ वाढीची अवस्था | फळधारक बागेत, फक्त फळ वाढीच्या अवस्थेत तेलकट डाग व्यवस्थापणासाठी जर फळावर १० ते २५ % पर्यन्त प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आणीबाणीच्या वेळी ४ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या घेण्यात याव्यात जेणे करून रोगाचा प्रसार थांबेल नंतर गरजेनुसार एकच फवारणी करावी. पहिली फवारणी: कॉपर हायड्रोक्साइड ५३.८% @ २ ग्राम प्रती लीटर + स्ट्रेप्टोसायक्लीन १००% @ ०.५ ग्रॅम प्रती लीटर + ब्रोनोपॉल ९५ – ९८ % ०.५ ग्रॅम प्रती लिटर + स्प्रेडर स्टीकर @ ०.५ मिली प्रती लिटर पुढील चार दिवस कोणतीही फवारणी करू नये व पाचव्या दिवशी दुसरी फवारणी करावी. दुसरी फवारणी: कार्बेंडीजम ५०% डब्ल्यु पी @ १ ग्रॅम प्रती लिटर + स्ट्रेप्टोसायक्लीन १००% @ ०.५ ग्रॅम प्रती लीटर + ब्रोनोपॉल ९५ – ९८ % ०.५ ग्रॅम प्रती लिटर + स्प्रेडर स्टीकर @ ०.५ मिली प्रती लिटर फवारणी करावी. |
केळी (Banana Plantation) | लागवड | बागेतील जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवावी. त्या करिता उभी आडवी कुळवणी करावी. दर ३ महीने अंतराने टिचणी बांधणी करावी. झाडांना मातीची भर द्यावी. केळीच्या बुंध्यालगत अनेक पिले येऊ लागतात. ती वेळच्या वेळी धारदार कोयत्याने नियमित काढून टाकावीत. केळीची रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत. आवशक्यता भासल्यास झाडास आधार द्यावा. |
जनावरांचे व्यवस्थापन (Animal Management) | तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची तसेच आपल्या जनावरांची काळजी घ्यावी व जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. गाईला दुग्ध उत्पादनाच्या (milking Cow) प्रमाणात खाद्य द्यावे. गाईला दररोज सरासरी १५ ते २० किलो हिरवा चारा व ५ ते ८ किलो कोरडा चारा द्यावा. शरीर पोषणासाठी दिड ते दोन किलो खुराक द्यावा. तसेच दुध उत्पादानासाठी दुधाच्या ३० % खुराक द्यावा. शेळयांना गोचीड व पिसवा यांपासून त्रास होऊ नये म्हणून डेल्टामेथ्रिन हे रसायन असलेले (उदा. ब्युटोक्स) द्रावण पशूवैदकाच्या सल्ल्याने गोठयत व शेळयांच्या अंगावर फवारावे. |