Farmer’s Protest In Punjab: दिल्ली (Delhi) : हवामानाच्या अनिश्चिततेमुळे (uncertainty of the weather) देशातील अनेक राज्यांमध्ये यावेळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्यातही अतिवृष्टी (Maharashtra heavy rains) झाल्याने लाखो शेतकरी आर्थिक संकटात (financial crisis) आहेत. अशावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याकडे सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी (Farmers in Maharashtra) तरीही शांत आहेत, पण पंजाबही त्यातला अपवाद आहे. पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे येथे हजारो एकर पिके उद्ध्वस्त झाली झाल्याने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी संगरूर जिल्ह्यातील शेतकरी मुख्यमंत्री भगवंत भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन करीत आहेत.
- Agriculture News: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून दुहेरी दिवाळी भेट; पहा काय असेल ही भेट
- Subsidy on Banana Farming: केळी उत्पादकांना मिळणार अनुदान..! पहा नेमकी काय आहे स्कीम
- Bee Keeping Farming: 85 % अनुदानासह सुरू करा व्यवसाय; पहा सरकारी योजनेची माहिती
हे शेतकरी सलग 12 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. पाऊस आणि पिकावरील किडींच्या हल्ल्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, भात पेंढ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रति क्विंटल 200 रुपये, भूसंपादनासाठी नुकसान भरपाई, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई, मका, मूग, बासमती या पिकांचे एमएसपी आदी मागण्यांसाठी पंजाबच्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अनिश्चित काळासाठी आंदोलन करत आहेत. (Farmers of Sangrur district are protesting near the residence of Chief Minister Bhagwant Bhagwant Mann to compensate for the damaged crops)
याबाबत बीकेयू सरचिटणीस सुखदेव सिंग कोकरीकलां म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूचा घेराव सुरू केला आहे. या मागण्यांबाबत सरकारने आपली हलगर्जी वृत्ती कायम ठेवल्यास रस्त्याच्या दुतर्फाही रास्ता रोको करण्यात येईल. याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी तीन किमी लांबीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रॉली उभ्या केल्या आहेत.” येथे आंदोलक रेशन, गाद्या, एलपीजी सिलिंडर, पंखे आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन आंदोलनस्थळी उभे आहेत. सुखदेव सिंग म्हणाले की, त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी ते आंदोलन आणखी तीव्र करण्यास तयार आहेत.