Credit Card : क्रेडिट कार्डधारकांनो, ‘ही’ बातमी वाचाच; नाहीतर मिळणार नाही 30 जूननंतर सुविधा

Credit Card : जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. जर तुम्ही ही बातमी वाचली नाही तर तुम्हाला 30 जूननंतर काही सुविधापासून वंचित राहावे लागू शकते.

मिळणार नाही 30 जूननंतर सुविधा

अनेक क्रेडिट कार्ड वापरकर्ते त्यांची बिले PhonePe, Cred, BillDesk, Infibeam Avenues इत्यादी फिनटेक कंपन्यांद्वारे भरतात. काही काळापूर्वी, रिझर्व्ह बँकेने नियम जारी केला होता की सर्व क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांना भारत बिल पेमेंट सिस्टमवर नोंदणी करावी लागणार आहे.

इतकेच नाही तर त्या फिनटेक कंपन्यांना बीबीपीएसवर नोंदणी करावी लागणार आहे, ज्याद्वारे बिल पेमेंट करण्यात येते. रिझर्व्ह बँकेने त्याची मर्यादा 30 जून निश्चित केली होती. ऑनलाइन फसव्या व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी, निराकरण करण्यासाठी आणि अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून हा निर्णय घेण्यात आला होता.

…तर तुम्हाला भरता येणार नाही PhonePe Pay कंपन्यांकडून बिल

रिझर्व्ह बँकेच्या काही नियमांनुसार, 30 जूननंतर अशा वापरकर्त्यांना या फिनटेक कंपन्यांद्वारे बिले भरणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. आतापर्यंत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँकेने बीबीपीएसवर नोंदणी केली नसून या बँकांचे पाच कोटींहून अधिक क्रेडिट कार्ड वापरकर्ते आहेत.

त्याशिवाय PhonePe आणि Cred आधीच BBPS वर नोंदणीकृत आहेत. BBPS वर नोंदणी न केलेल्या बँकांचे वापरकर्ते देखील 1 जुलैपासून फिनटेक कंपन्यांच्या ॲप्सद्वारे कार्ड बिल भरता येणार नाही. जर या कंपन्यांनी 30 जूनपर्यंत BBPS वर नोंदणी केल्यास वापरकर्त्यांना बिल भरण्यास कसलीही अडचण येणार नाही.

समजा जर तुम्ही एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक किंवा ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला इतर पद्धतींद्वारे बिल भरता येईल. तुम्ही बँकेच्या ॲप किंवा वेबसाइटवर जाऊन थेट बिल भरू शकता. त्याशिवाय तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारेही बिल भरू शकता.

परदेशात क्रेडिट कार्ड वापरणे होणार महाग

परदेशात क्रेडिट कार्ड वापरणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. कारण परदेशातील खर्च टीडीएसच्या कक्षेत येऊ शकतो. रिझर्व्ह बँक लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम मध्ये बदलांवर काम करत असून जर याची अंमलबजावणी झाली तर जे क्रेडिट कार्ड वापरकर्ते क्रेडिट कार्डद्वारे एका वर्षात 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करतात त्यांना 20 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे.

Leave a Comment