Facebook Update : अर्रर्रर्र,  Facebook-Instagram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे, मेटाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Facebook Update : देशासह संपूर्ण जगात लोकप्रिय असणारे मेसेजिंग Apps Facebook आणि Instagram तुम्ही देखील वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

हे जाणून घ्या कि, मेटाने एक मोठा निर्णय घेत आता मेटा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी यूज़र्सला पैसे भरावे लागणार आहे. होय, जाहिरातमुक्त Facebook आणि Instagram वापरण्यासाठी तुम्हाला फी भरावी लागेल. मात्र हे जाणून घ्या कि, मेटाने हा नवीन नियम भारतात नाहीतर  युरोपातील काही देशांमध्ये लागू केला आहे. मात्र येणाऱ्या दिवसात हा नियम भारतात देखील लागू होऊ शकते.

कंपनीने सबस्क्रिप्शन मॉडेलचे शुल्क कमी केले आहे. Facebook साठी शुल्क कमी करून EUR 5.99 (सुमारे 540 रुपये) करण्यात आले आहे. त्याच वेळी, इंस्टाग्रामची फी कमी करून EUR 9.99 (सुमारे 900 रुपये) करण्यात आली आहे. कंपनीने प्रायव्हसी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. खरं तर, या धोरणाला युरोपमधील गोपनीयता कार्यकर्ते आणि ग्राहक गटांकडून विरोध केला जात होता.

गोपनीयतेची खात्री करण्यासाठी हे शुल्क भरावे लागेल, असे मेटाकडून सांगण्यात आले. वास्तविक मेटा आपल्या वापरकर्त्यांचा डेटा वापरत असे, परंतु युरोपियन नियमांच्या नवीन डेटा गोपनीयता कायद्यानंतर, मेटाने डेटा ऍक्सेस करण्यास सक्षम नसल्यामुळे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबरमध्ये लागू झालेल्या या नियमाला मोठा विरोध झाला होता. हे शुल्क 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांकडून वसूल केले जात होते.

युरोपियन युनियन आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांसाठी मेटा चार्ज लागू करण्यात आला. 1 नोव्हेंबरपासून लागू झाल्यानंतर, सुरुवातीला ते 9.99 युरो (सुमारे 880 रुपये) प्रति महिना ठेवण्यात आले होते. तसेच, iOS आणि Android वापरकर्त्यांना 12.99 युरो (सुमारे 1,100 रुपये) भरण्यास सांगितले होते. मात्र, आता हे प्रमाण बरेच कमी झाले आहे. तरीही काही संघटना याला विरोध करत आहेत.

लोकांची गोपनीयता राखणे हे कंपनीचे काम आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी वापरकर्त्यांकडून शुल्क आकारले जाऊ नये.

Leave a Comment