Facebook Instagram Down : काल फेसबूक, इन्स्टाग्राम, थ्रेड्स या सोशल नेटवर्किंग साइट्स (Facebook Instagram Down) एक तास बंद राहिल्या होत्या. फेसबूक अचानक लॉग आऊट झाले. त्यामुळे युजर्सना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हे झालं वापरकर्त्यांच्या बाबतीत. पण, या कंपनीचा मालक मार्क झुकरबर्गला (Mark Zukerberg) तर कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. वीबुश सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक डॅन इव्स यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की या प्रकारामुळे मार्क झुकरबर्गला तब्बल 100 मिलीयन डॉलर्सचे नुकसान झाले. तसेच मेटाच्या शेअर्सची किंमतही कमी झाली. या शेअर्सच्या किंमतीत 1.6 टक्क्यांची घसरण दिसून आली.
Facebook Instagram Down
फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत मार्क झुकरबर्ग जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. त्याची एकूण संपत्ती 139.1 अब्ज डॉलर्स इतकी अफाट आहे. 2023 मध्ये त्याच्या एकूण संपत्तीत 84 बिलियन डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली. यानुसार जर पाहिलं तर एका तासाच्या कमाईत 9.3 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली. ज्यावेळी मेटा प्लॅटफॉर्म डाऊन झाले होते. त्यावेळी ट्विटरचा मालक एलन मस्कने जोरदार टीका केली होती. यानंतर मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्व युजर्सची माफी मागितली. लवकरात लवकर काम सुरू करून एका तासात फेसबूक, इन्स्टाग्रामची सेवा पूर्ववत करण्यात आली.
New Rules । आजपासून बदलले हे नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर येणार आर्थिक ताण
Facebook Instagram Down