Eye Care Tips : डोळ्यांचे आरोग्य जपा! ‘या’ खास टिप्सच्या मदतीने घ्या डोळ्यांची काळजी

Eye Care Tips : आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत यामध्ये आता डोळ्यांच्या (Eye Care Tips) समस्यांची ही भर पडली आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लॅपटॉप, मोबाईल या ऑनलाइन साधनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे तासनतास स्क्रीन समोर बसावे लागते. यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येत असून डोळे दुखणे, चष्मा लागणे अशा समस्या निर्माण झाल्या आहे. डोळे हा शरीरातील अति संवेदनशील भागांपैकी एक आहे डोळ्यांशी संबंधित बाबींमध्ये प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमी चांगले असते. तसेच काही काळजी घेतल्यास तुम्हाला डोळ्यांचे आरोग्य राखण्यास निश्चित मदत होईल.

लहान वयात चष्मा लागणे ही आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. खाण्यापासून ते राहणीमानापर्यंतच्या जीवनशैलीचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असतो. तुम्हालाही चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर या लेखातील माहिती तुम्हाला मदत करू शकेल. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही डोळ्यांची योग्य काळजी घेऊ शकाल.

Improve Heart Health : हृदयाचे आरोग्य बिघडतयं? तर मग आजच करा ‘हे’ महत्त्वाचे काम

Eye Care Tips

20-20-20 नियम

हा नियम डोळ्यांना फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला फक्त एवढेच करायचं आहे की मोबाईल, लॅपटॉपवर काम करत असताना दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांनी तुमची नजर वीस ते पंचवीस फूट अंतरावर असलेल्या वस्तूकडे टाकायचे आहे. डोळ्यांचा हा एक प्रकारचा व्यायामच आहे. ज्याद्वारे तुमच्या डोळ्यांची हालचाल होईल आणि चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी मदत होईल.

योग्य आहार घ्या

समतोल आहार ज्यामध्ये पुरेशा प्रमाणात पोषण असते. हे डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आहारात विटामिन सी आणि झिंक सारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करू शकता. जसे की लिंबूवर्गीय फळे, हिरव्या पालेभाज्या, अंडी यांसारख्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्याचा डोळ्यांना फायदा मिळू शकेल.

Eye Care Tips

व्यायाम

ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम आवश्यक असतात. तसेच डोळ्यांचीही काही व्यायाम आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमची दृष्टी तीक्ष्ण आणि डोळे निरोगी ठेवू शकता. काही सोपे व्यायाम आहेत जे तुम्ही घरी देखील करू शकता. जसे की डोळे फिरवणे, दूर असलेले एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, डोळे बंद केल्यानंतर बाहुली फिरवणे इत्यादी या व्यायामाचे नियमितपणे पालन केल्यास चष्म्याची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

Liver disease : मधुमेहींनो, या लक्षणांवरून ओळखा तुमचे यकृत खराब होत आहे की नाही? जाणून घ्या सविस्तर

Eye Care Tips

चांगली काळजी

जर तुम्हालाही मोबाईल स्क्रीनवर जास्त वेळ घालवण्याची सवय असेल तर डोळ्यांच्या दृष्टीने हे नुकसानदायक ठरू शकते. अशा स्थितीत जर तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल किंवा डोळ्यांची योग्य काळजी घ्यायची असेल तर डोळ्यांना विश्रांती देणे आवश्यक आहे. डोळ्यांची नियमित तपासणी करायला विसरू नका याशिवाय डोळ्यांना धुळीपासून संरक्षण देणे देखील महत्त्वाचे आहे. या दृष्टीने तुम्ही डोळ्यांचे काळजी घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा मिळेल.

टीप : या लेखातील माहिती फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने आहे त्याचा व्यवसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये आपल्याला काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment