explosion in Iraq: इराक देशाच्या पूर्व बगदादमध्ये (eastern Baghdad) झालेल्या स्फोटात तब्बल 10 जण ठार झाले आहेट. तर, किमान 20 जखमी झाले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट फुटबॉल स्टेडियम आणि कॅफेजवळ (blast took place near a football stadium and a cafe) झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या संदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचे काम स्थानिक पोलिस यांनी सुरू केले आहे.
- Russia Ukraine War : युद्धाच्या संकटातही पैशांचा पाऊस; ‘त्या’ भीतीमुळे युरोपीय देश युक्रेनला करणार अब्जावधींची मदत
- Russia Ukraine War : पुतिन यांची मोठी घोषणा; ‘त्या’ निर्णयामुळे युक्रेनचे टेन्शन आणखी वाढणार..
- Goat Farming Tips: म्हणून मोठ्या कराडांना द्या ‘हा’ खुराक; वाचा नफा वाढवणारी माहिती
सुरक्षा अधिकार्यांनी शनिवारी सांगितले की, बगदादमधील फुटबॉल मैदानाजवळ (football field in Baghdad) गॅस टँकरचा मोठा स्फोट (gas tanker exploded) झाला. या स्फोटात निवासी इमारती आणि फुटबॉल मैदानाचेही खूपच नुकसान झाले. तसेच हा स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाला की जाणूनबुजून केलेला हल्ला हे स्पष्ट होऊ शकले नाही, असेही म्हटले आहे. ही घटना घडली तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेले फुटबॉल खेळाडू व अधिकाऱ्याने सांगितले की, गॅस टँकरच्या स्फोटात बळी पडलेले बहुतेक फुटबॉल खेळाडू (Football players) होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आता इराकमध्ये नवीन सरकार स्थापन (new government in Iraq) झाल्यानंतर फक्त दोन दिवसांनी हा स्फोट झाला. त्यामुळे याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. इराकच्या संसदेने गुरुवारी पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी (Prime Minister Mohamed Shia al-Sudani) यांच्या नेतृत्वाखालील 21 सदस्यीय मंत्रिमंडळाला मंजुरी दिली. गेल्या वर्षी विविध शिया गटांमधील तीव्र मतभेदांमुळे संसद ठप्प झाली होती. (political standstill due to sharp differences between various Shia factions)