Exit Poll 2024 : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणूक सात टप्प्यात संपली आहे. येत्या 4 जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत, निकालाकडे संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागले आहे. अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणाची जादू चालेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. निकालाबाबत याबाबत दैनिक भास्करच्या एक्झिट पोल ने यूपीची आकडेवारी जाहीर केली आहे.
दैनिक भास्कर एक्झिट पोल ची आकडेवारी
भाजप- 52-57
RLD-2
अपना दल – 1
समाजवादी पक्ष- 14-18
काँग्रेस- 3-4
बसपा-0
इतर- 2-5
दोन्ही जागांवर आरएलडीचा होणार फायदा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आरएलडी, सुभाषप आणि निषाद पार्टीची भाजपसोबत युती होती. ज्यामध्ये RLD ने पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत आणि बिजनौरच्या दोन लोकसभा जागांवर निवडणूक लढवली असून एक्झिट पोलनुसार या दोन्ही जागांवर जयत चौधरींचा पक्ष विजयी होत आहे.
तसेच अनुप्रिया पटेल यांच्या पक्षाने मिर्झापूर आणि रॉबर्टसगंज या दोन जागांवर निवडणूक लढवण्यात आली आहे. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर, अपना दल (एस) एका जागेवर फटका बसत आहे.
बसपाला खातेही उघडता आले नाही
एक्झिट पोलमध्ये यूपीमध्ये काँग्रेस आणि सपा यांच्या युतीला मोठा फायदा होत असून समाजवादी पक्ष 14-18 जागांवर विजयी होताना पाहायला मिळत आहे, तर काँग्रेस 3-4 जागांवर विजयी होताना दिसत आहे. पण 2019 च्या निवडणुकीत 10 जागा जिंकणाऱ्या मायावतींच्या पक्ष बसपाचे खातेही उघडत नाही, हा एक्झिट पोल बसपाला 0 जागा दाखवत असून इतरांच्या खात्यात 2-3 जागा दाखवत आहे.
जाणून घ्या 2019 चा निकाल?
भाजप- 62
बसपा- 10
समाजवादी पक्ष- 5
अपना दल 2
काँग्रेस- 1