नवी दिल्ली : युरोपियन युनियनने ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांना ट्विटरवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. EU उद्योग प्रमुख थियरी ब्रेटन यांनी बुधवारी सांगितले, की ट्विटरने डिजिटल नियमांचे पालन केले पाहिजे, तसे न केल्यास त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आपल्या वक्तव्यात त्यांनी ट्विटरवर वापरल्या जाणाऱ्या फेक न्यूज आणि भेदभाव करणाऱ्या पोस्ट्सला आळा घालण्यावरही भर दिला.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युरोपियन युनियनच्या डिजिटल पॉलिसीचे आयुक्त थियरी ब्रेटन यांनी बुधवारी मस्क यांच्याबरोबर बैठक केली. त्यांनी बैठकीदरम्यान मस्क यांना सांगितले की त्यांना नवीन नियमांची चेकलिस्ट पाळावी लागेल, ज्याला डिजिटल सेवा कायदा देखील म्हणतात. युरोपियन कमिशनचे न्यायमूर्ती डिडिएर रँडर्स यांनीही अशीच टीका केली.
ब्रेटनच्या म्हणण्यानुसार, मस्कने प्रतिक्रिया देत म्हटले की नवीन नियम लवकरच लागू केले जातील. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षणही या व्यासपीठावर केले जाईल, असे ते म्हणाले. यावर ब्रेटनचे म्हणणे आहे की, युरोपियन युनियनच्या ऐतिहासिक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मस्क यांच्याकडे समंजस दृष्टीकोन आहे याचा त्यांना आनंद आहे.
मस्कने याआधी सांगितले होते की नवीन धोरणांतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु प्रवेशाचे स्वातंत्र्य नाही. ट्विटरवर कोणतीही जाहिरात आणि इतर महसूल जनरेट होणार नाही. या व्यतिरिक्त आणखीही काही महत्वाचे बदल कंपनीने केले आहेत. या बदलांसह ट्विटरमध्ये आणखी सुधारणा केल्या जात आहेत.
- हे सुद्धा वाचा : खुशखबर..! .. म्हणून मस्कने टाळला वसुलीचा ‘तो’ प्लान; पहा, ट्विटरबाबत काय आहे नवे धोरण ?
- .. म्हणून एलोन मस्क यांनी लोकांना विचारला ‘हा’ प्रश्न; पहा, काय उत्तरे मिळालीत मस्कला