मुंबई : जनतेला महागाईतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. वास्तविक, देशात किरकोळ महागाईचा दर कमी होऊ लागला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) ऑक्टोबर 2022 साठी देशांतर्गत ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) डेटा सोमवारी जारी केला. ताज्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 6.77 टक्क्यांवर आला आहे.
किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये तीन महिन्यांच्या सर्वात कमी पातळीवर आला आहे, जो सप्टेंबरमध्ये 7.41 टक्के होता. तथापि, ही सलग दहावी वेळ आहे जेव्हा CPI वर आधारित किरकोळ महागाई दर रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 6 टक्क्यांच्या वरच्या मार्जिनपेक्षा जास्त आहे. घट होऊनही चलनवाढीचा दर अजूनही रिजर्व्ह बँकेने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान राखण्याचे बँकेचे लक्ष्य आहे. या वर्षी जानेवारीपासून किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांच्या समाधानकारक मर्यादेच्या वर राहिला आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. घाऊक महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 19 महिन्यांच्या कमी म्हणजे 8.39 टक्क्यांवर आला आहे. दीड वर्षानंतर पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर सिंगल डिजिटमध्ये आला आहे. यापूर्वी मार्च 2021 मध्ये तो 7.89 टक्के होता. एप्रिल 2021 पासून, घाऊक महागाई सलग 18 महिने 10 टक्के किंवा त्याहून अधिक आहे. सप्टेंबरमध्ये ते 10.79 टक्के होते, तर एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये ते 13.83 टक्के होते.
किरकोळ महागाईचा दर कमी होताना दिसत आहे. खाद्य पदार्थांच्या किंमती कमी होत असल्याने असे होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचे परिणाम दिसण्यास आणखी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेही देशात महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईतून दिलासा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असले तरी त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.
- वाचा : Inflation : जगभरात महागाईचे थैमान; ‘या’ देशांमध्ये उडाला हाहाकार; जाणून घ्या अपडेट
- Inflation : ‘त्या’ संकटाने श्रीमंत देशांत उडालाय हाहाकार; पहा, कशामुळे आहेत लोक हैराण